---Advertisement---

हे फलंदाज करू शकतात येत्या काळात कारकिर्दीतील १० हजार वनडे धावा !

---Advertisement---

दोन दशकांपूर्वी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या २६ वर्षांच्या इतिहासात एकाही खेळाडूने कारकिर्दीत १०,००० धावा पूर्ण केल्या नव्हत्या. जेव्हा विंडीज विंडीजचा दिग्गज दिग्गज फलंदाज डेसमंड हेन्स १९९४ मध्ये निवृत्त झाला तेव्हा त्याच्या नावे ८६४८ वनडे धावा होत्या. तेव्हा तो महान फलंदाज व्हीव्ह रिचर्ड्सपेक्षाही पुढे होता. त्या काळात त्याचा हा रेकॉर्ड मोडणे ही अवघड गोष्ट होती.

दोन वर्षानंतर भारताच्या महंमद अजरद्दीनने त्याचा विक्रम मोडला आणि सर्वांना असे वाटू लागले की आता हा विक्रम कोणी मोडू शकणार नाही. पण तेव्हाच भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर वनडे क्रिकेटमध्ये १०,००० धावा केल्या आणि असे करणारा तो पहिला क्रिकेटर बनला.

सचिननंतर १० फलंदाजांच्या नावे वनडेमध्ये हा विक्रम झाला. या यादीत आपले नाव लिहणारा श्रीलंकेचा सलामीवीर तिलकरत्ने दिलशान हा सर्वात शेवटचा फलंदाज आहे. त्यानंतर अशी कामगिरी कोणीच केली नाही.

यावर्षी काही क्रिकेटपटूंना हा विक्रम करण्याची संधी आहे. त्यात २०१७-१८ मोसमात या धावा होऊ शकतात-

१.महेंद्रसिंग धोनी ९७४५

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा या दशकतीलच नाही तर भारताचा आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या महान खेळाडूंपैकी एक आहे.
१०,००० धावा करणाऱ्या फलंदाजांच्या क्लबमध्ये सामील होण्यासाठी धोनीला फक्त २५५ धावांची गरज आहे. सध्या खेळत असलेल्या फलंदाजांपैकी धोनी हा वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.

जर त्याने हा विक्रम न्यूझीलंड मालिकेत केला तर तो सर्वात लवकर असे करणारा तिसरा फलंदाज बनेल. वनडेमध्ये त्याची सरासरी ५२ ची आहे आणि या यादीत ही सर्वाधिक आहे. धोनीनंतर सर्वाधिक सरासरी असणारा खेळाडू आहे सचिन तेंडुलकर आणि सचिनची सरासरी आहे ४२.

२. ख्रिस गेल ९३५२
वनडे क्रिकेटमध्ये गेलने ९ हजारपेक्षा अधिक धावा जमवल्या आहेत. हे तुम्हाला कदाचित खरे वाटणार नाही. त्याने आपल्या या कारकिर्दीतएकूण ९३५२ वनडे धावा केल्या आहे. गेल हा त्याच्या उंच षटकार आणि टी-२० मधील खेळीसाठी प्रसिद्ध आहे.

संघ आणि विंडीज मंडळ यांच्यातील वादामुळे गेल काही काळ देशाच्या वनडे संघात नव्हता. तरीही तो १०,००० धावा करणाऱ्या फलंदाजांच्या क्लबमध्ये स्थान मिळवू शकतो. त्याला फक्त ६४८ धावांची गरज आहे.

३. ए बी डिव्हिलर्स ९३१९
मिस्टर ३६० म्हणून जगभरात प्रसिद्ध असेलेल्या एबी डिव्हिलर्स हा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. एबीने आता क्रिकेटचे सर्व प्रकार खेळण्याचे ठरवले आहे. ज्यामुळे या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी तरी एबी नक्कीच हा विक्रम करेल.
एबीची सरासरी ५३ची आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यांच्या स्पर्धकांमध्ये ही त्याचे सर्वाधिक स्ट्राइक रेट (१००.२५) आहे. केवळ वीरेंद्र सेहवाग आणि शाहिद आफ्रिदीचा स्ट्राइक रेट (किमान ३००० धावा) जास्त आहे. पण त्यांची सरासरी तुलनेने खूप कमी आहे.

४.विराट कोहली ८७०७
भारताच्या या तरुण कर्णधाराला नियमित अंतराने विक्रम करण्याची सवय लागली आहे आणि हे आता हा ही विक्रम तो करणार हे नक्की. तो फक्त १२९३ धावा दूर आहे, पण त्याचा फॉर्म आणि क्लास पाहून ते जवळपास निश्चित आहे की तो २०१९च्या विश्वचषकापूर्वी हा विक्रम आपल्या नावे करेल.
आता खेळत असलेल्या सर्व फलंदाजामध्ये विराटची सरासरी सर्वाधिक आहे. असे दिसून येते की विराट १०,००० वनडे धावा करणारा सर्वात जलद फलंदाज बनेल.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंदोरमधील तिसऱ्या वनडे सामन्यात, त्याने युवराज सिंगला भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मागे टाकून आता तो चौथ्या स्थानावर गेला आहे.

५. युवराज सिंग ८७०१
ऑस्ट्रेलियाविरुद्ध चालू असलेल्या वनडे मालिकेतून युवराजला विश्रांती देण्यात आली आहे. मागील मालिकेत पण त्याला विश्रांती देण्यात आली होती. आता ज्या पद्धतीने भारतीय संघ खेळत आहे, युवराज सिंगचे संघात पुनरागमन होणे अवघड दिसत आहे.
पण याआधी पण युवराज या परिस्थितीतुन गेला आहे आणि आपल्याला माहीत आहे की युवराज संघात पुनरागमन करण्याची धमक ठेवतो. युवराज १०,००० च्या टप्यापासून १२९९ धावा दूर आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment