भारतीय क्रिकेटचे २०२१ हे वर्ष आता संपत आले आहे. नवीन वर्षात भारतीय संघ नव्या ध्यासाने खेळताना दिसेल. भारतीय संघासाठी २०२१ हे वर्ष चढ-उतारांचे राहिले. संघाला २ वेळा आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची संधी आली, पण संघ अपयशी ठरला. परंतु, काही गोष्टी चांगल्यासुद्धा घडल्या. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ३६ वर सर्वबाद होऊन संघाने २-१ ने मालिका जिंकत जे पुनरागमन केले, ते ऐतिहासिक होते. ऑस्ट्रेलियाने जिथे मागील ३२ वर्षे कसोटी हरली नाही अशा गॅबाच्या मैदानावर भारताने कसोटी जिंकली.
घरच्या मैदानावर इंग्लडकडून पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर ३-१ ने मालिका जिंकत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जागा मिळवली. यादरम्यान बऱ्याच खेळाडूंनी पदार्पण करून उत्कृष्ट प्रदर्शन करत संघाला विजय मिळवून दिला. अशाच ५ खेळाडूंबद्दल आपण या लेखात जाणून घेऊ, ज्यांनी २०२१ वर्षांत क्रिकेटच्या वेगवेगळ्या प्रकारात भारताकडून पदार्पण करताना चमकदार कामगिरी केली.
ईशान किशन (Ishan Kishan)
ईशान किशन या झारखंडच्या युवा यष्टिरक्षकाने यावर्षीच इंग्लंड विरुद्ध टी२० मालिकेतून पदार्पण केले होते. पदार्पणातच त्याने अर्धशतकसुद्धा ठोकले. त्याने ५६ धावा केल्या. त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात भारतीय संघ विजयी झाला. त्याने त्यानंतर श्रीलंका दौऱ्यावर वनडे सामन्यात पदार्पण केलं. तिथे २ सामन्यात ६० धावा केल्या. पहिल्या सामन्यात १ वर बाद झालेल्या किशनने दुसऱ्या सामन्यात ५९ धाव केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला.
ईशान किशन वरच्या फळीत विस्फोटक फलंदाजी करू शकतो आणि यष्टिरक्षणसुद्धा करू शकतो. रिषभ पंत संघात असल्याने किशनला तिसऱ्या-चौथ्या क्रमांकावर विस्फोटक फलंदाज म्हणून तयार करण्यात येत आहे. जे ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकात उपयोगी पडेल.
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)
बऱ्याच काळापासून चांगलं प्रदर्शन केल्यानंतर अखेर सूर्यकुमार यादवला निवडकर्त्यानी भारतीय संघात संधी दिली. ईशान किशनसोबतच सूर्यकुमार यादवने इंग्लंड विरुद्ध पदार्पण केले. त्याने पदार्पणाच्या दिवशी फलंदाजी केली नाही. नंतर फलंदाजी करून अर्धशतक केले. सूर्यकुमार संघात आल्याने मधली फळी मजबूत झाली आहे. त्याच्या कामगिरीमुळेच त्याला टी२० विश्वचषकासाठी संघात घेण्यात आलं.
सूर्यकुमारने आतापर्यंत ११ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत ९ डावांमध्ये २४४ धावा केल्या आहेत. यात ३ अर्धशतक समाविष्ट आहेत. एकदिवसीय सामन्यात श्रीलंका दौऱ्यावर पदार्पण करून एका अर्धशतकासह १२४ धावा केल्या आहेत.
हर्षल पटेल (Harshal Patel)
हर्षल पटेल आयपीएल २०२१ मध्ये केलेल्या प्रदर्शनामुळे निवडकर्त्यांच्या नजरेत आला आणि त्याने आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये पदार्पण केलं. हर्षल पटेलने आयपीएल २०२१ मध्ये ३२ विकेट्स घेऊन एकाच हंगामात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा ड्वेन ब्रावोच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्याने पहिल्या सत्रात मुंबई इडिअन्स विरुद्ध ५ विकेट्स घेतल्या, तर दुसऱ्या सत्रात हॅट्रिक घेतली. उत्कृष्ट प्रदर्शन करून त्याने निवडकर्त्यांना त्याला संधी द्यायला भाग पाडलं.
टी२० विश्वचषकानंतर झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत त्याने पदार्पण केले. त्याने पदार्पणात २ विकेट्स घेतल्या आणि सामनावीरही ठरला. तसेच पुढच्या सामन्यातसुद्धा त्याने २ विकेट्स घेऊन १८ धावा सुद्धा केल्या.
वेंकटेश अय्यर (Venkatesh Iyer)
आयपीएल २०२१ (IPL 2021) च्या दुसऱ्या सत्रात वेंकटेश अय्यरने दमदार प्रदर्शन करून सर्वांना चकित करून सोडले होते. उत्कृष्ट फलंदाजी करत संघाला अंतिम फेरीत पोहचवले. त्याने सलामीवीर म्हणून फलंदाजी करताना १० सामन्यात ३७० धावा केल्या. भलेही कोलकाता नाईट रायडर्स ट्रॉफी नाही जिंकू शकली, पण या खेळाडूचं नशीब मात्र बदललं.
त्याला न्यूझीलंड विरुद्ध टी-२० मालिकेत खेळायची संधी मिळाली. शेवटच्या षटकांत फलंदाजीला गेला, तेव्हा पहिल्या चेंडूवरच चौकार मारून संघाचा दबाव कमी केला. सामना रिषभ पंतने संपवला असला, तरी अय्यरच योगदान मोलाचं होतं.
संघ व्यवस्थापन हार्दिक पंड्यासारखा (Hardik Pandya) एक खेळाडू शोधत आहे, जो खालच्या फळीत विस्फोटक फलंदाजी करेल आणि गोलंदाजी करून विकेट्स सुद्धा घेईल. त्यामुळे वेंकटेशकडे हार्दिकचा पर्यायी खेळाडू म्हणून पाहिले जात आहे. सध्या वेंकटेश विजय हजारे ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करत आहे. २ शतके आणि १ अर्धशतक करत त्याने मध्य प्रदेशला तो विजय मिळवून दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
कुलदीप यादवच्या कामगिरीतील घसरणीचं कारण एमएस धोनी? वाचा सविस्तर
ना विराट… ना रोहित… ‘हा’ असणार भारताचा नवा कर्णधार? बीसीसीआय देणार मोठा धक्का?
“रहाणेला पुन्हा उपकर्णधार बनवा”; दिग्गजाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी केली मागणी