दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जॉन्टी रोड्स आज (27 जुलै) 53 व्या वर्षात पदार्पण करत आहे. तो त्याच्या अफलातून क्षेत्ररक्षणासाठी आणि हवेत सूर मारून झेल पकण्याच्या खास शैलीसाठी ओळखला जातो.
विश्वचषक 1992 च्या स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध रोड्स यांनी हवेत सूर मारत इंजमाम उल हकला केलेले धावबाद कायमचं क्रिकेट चाहत्यांच्या आठवणीत राहिले आहे. तसेच भारतातही तो लोकप्रिय खेळाडू आहे. आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचा ते क्षेत्ररक्षक प्रशिक्षकही राहिले आहेत.
https://twitter.com/cricketworldcup/status/1287613688220995585
त्यांनी 26 फेब्रुवारी 1992 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्यानी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 52 कसोटी सामन्यात 2532 धावा केल्या आहेत. तर 34 झेल घेतले आहेत. तसेच 245 वनडे सामन्यात 5935 धावा केल्या असून 105 झेल घेतले आहेत.
कसोटी पदार्पण-
जॉन्टी रोड्सने कसोटी पदार्पण भारताविरुद्ध १३ नोव्हेंबर १९९२साली डर्बन येथे केले. हे त्याचे घरचे मैदान आहे.
दोन वेळा हुकली ऑलिंपिक वारी-
क्रिकेटबरोबरच जॉन्टी रोड्स दक्षिण आफ्रिकेकडून हाॅकीमध्येही खेळायचा. १९९२ला ऑलिंपिकसाठी जाणाऱ्या संघामध्ये त्याची निवड झाली होती. परंतु त्याचा संघच या स्पर्धेसाठी पात्र ठरला नाही. १९९६ ऑलिंपिकसाठीही त्याला संघाकडून बोलावणे आले होते परंतु तेव्हा तो जखमी असल्यामुळे संघासोबत जाऊ शकला नाही.
थेट विश्वचषकातच केले वनडे पदार्पण-
१९९२च्या विश्वचषकात त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलामीच्या सामन्यातच पदार्पण केले होते. हे पदार्पण सिडनी क्रिकेट मैदानावर २६ फेब्रुवारी १९९२ रोजी झाले होते. तो १९९२च्या विश्वचषकातील पहिलाच सामना होता.
नेहमीच चुकायची बस-
सामना झाल्यावर सराव करताना क्षेत्ररक्षणाचा चांगला सराव करता यावा म्हणुन तो जास्त वेळ सराव करायचा. यामुळे अनेक वेळा संघाला हाॅटेलला नेणारी त्याची बस चुकायची.
असं करणारा पहिला क्रिकेटर-
paternity leave घेणारा तो जगातील पहिला क्रिकेटर ठरला होता.
मुंबईतही खेळतो गोल्फ-
जॉन्टीला गोल्फ खेळणे प्रचंड आवडते. तो मुंबई इंडियन्स संघासोबत जेव्हा मुंबई शहरात असतो तेव्हा तो दररोज गोल्फ खेळतो.
दक्षिण आफ्रिकेचा सदिच्छादूत-
तो क्रिकेट खेळणाऱ्या देशांत दक्षिण आफ्रिकेतील टूरिझम (पर्यटन) वाढीसाठी प्रयत्न करतो. तो या क्षेत्रात देशाचा दक्षिण आफ्रिकेचा सदिच्छादूत म्हणूनही त्याने काम केले आहे.
मुलीचे नाव इंडिया-
जॉन्टी रोड्सला मुंबई शहरात कन्यारत्न पात्र झाले. यामुळे तिचे नाव रोड्सने तीचे नाव इंडिया असे ठेवले आहे. आयपीएल ८ तेव्हा सुरु होती तेव्हा २०१५मध्ये त्याला हे कन्यारत्न पात्र झाले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
भारताच्या विंडिजला व्हाईटवॉश देण्याच्या इराद्यावर पाऊस फेरणार पाणी? खेळपट्टीबद्दलही घ्या जाणून
मोठी बातमी: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपबाबत आयसीसीची महत्त्वाची घोषणा
डेविड वॉर्नरवर पुन्हा चढला अल्लू अर्जुनचा फिव्हर, ऍक्शन सीनमध्ये दिसतोय डॅशिंग