2024 या सरत्या वर्षाने निरोप घेतला आहे. आता 2025 हे वर्ष सुरू झालं. नव्या वर्षात अनेक क्रिकेटपटू नव्या अपेक्षा घेऊन आपली प्रतिभा दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. गेल्या वर्षी क्रिकेट जगतात अनेक गोष्टी घडल्या. अनेक आनंदाचे आणि दु:खाचे क्षण आले. 2024 या वर्षात अनेक महान क्रिकेटपटू तुम्हा-आम्हाला सोडून गेले. या लेखात आम्ही तुम्हाला अशा 5 नामवंत क्रिकेटपटूंबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी 2024 साली या जगाचा निरोप घेतला.
(5) दत्ता गायकवाड (भारत) – भारतातील सर्वात वयस्कर कसोटी क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या दत्ताजी राव गायकवाड यांनी 2024 मध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांचं गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये वयाच्या 95 व्या वर्षी निधन झालं. गायकवाड यांनी 1952 ते 1961 दरम्यान भारतासाठी एकूण 11 कसोटी सामने खेळले होते.
(4) डेव्हिड जॉन्सन (भारत) – भारताचे माजी वेगवान गोलंदाज डेव्हिड जॉन्सनचा यांचा इमारतीवरून पडून अचानक मृत्यू झाला. गेल्या वर्षी 20 जून रोजी चौथ्या मजल्यावरच्या बाल्कनीतून पडून वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. ते भारताकडून 2 कसोटी खेळले होते.
(3) मोहम्मद नाझीर (पाकिस्तान) – गेल्या वर्षी या जगातून निरोप घेणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये पाकिस्तानचे माजी फिरकीपटू मोहम्मद नाझीर यांचाही समावेश आहे. त्याचं वयाच्या 78 व्या वर्षी दीर्घ आजारानं निधन झालं. मोहम्मद नाझीर यांनी पाकिस्तानसाठी 14 कसोटी आणि 4 एकदिवसीय सामने खेळले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर नाझीर काही सामन्यांमध्ये अंपायर देखील राहिले होते.
(2) ग्रॅहम थॉर्प (इंग्लंड) – इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू ग्रॅहम थॉर्प यांनी 2024 मध्ये जगाचा निरोप घेतला. त्यांचं निधन चाहत्यांसाठी धक्कादायक होतं. थॉर्प यांनी 4 ऑगस्ट 2024 रोजी आत्महत्या केली. त्यांनी वयाच्या 55व्या वर्षी हे पाऊल उचललं. ग्रॅहम थॉर्प हे इंग्लंडच्या दिग्गज क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्यानं इंग्लंडसाठी 100 कसोटी आणि 82 एकदिवसीय सामने खेळले आहेत.
(1) अंशुमन गायकवाड (भारत) – माजी भारतीय क्रिकेटपटू आणि मुख्य प्रशिक्षक अंशुमन गायकवाड हे आता आपल्यात नाहीत. या माजी सलामीवीरानं 2024 साली जगाचा निरोप घेतला. अंशुमन गायकवाड यांनी कर्करोगाच्या आजारानं त्रस्त होते. त्यांचं 31 जुलै 2024 रोजी निधन झालं. त्यावेळी ते 71 वर्षांचे होते.
हेही वाचा –
शेवटची कसोटी ड्राॅ राहिली, तर भारत WTCच्या फायनलमध्ये पोहोचणार का? कसं आहे समीकरण
‘जसप्रीत बुमराह नसता तर बीजीटी एकतर्फी…’, ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा दावा
जसप्रीत बुमराह सिडनीत इतिहास रचणार? हरभजन सिंगचा हा महान विक्रम मोडण्याची शक्यता