क्रिकेट स्पर्धेत विविध कालांतराने विविध बदल होत गेले. कसोटी क्रिकेट पासून सुरु झालेला या क्रिकेटचा प्रवास, वनडे क्रिकेट आणि आता टी-२० क्रिकेट पर्यंत आला आहे. क्रिकेटने सर्व चाहत्यांना आपलंस केलं आहे. त्यात सर्वांची पहिली पसंती आहे टी-२० क्रिकेटला. यावरूनच २००८ साली भारतात सुरू झालेली टी-२० आयपीएल ही स्पर्धा चाहत्यांच्या अधिक पसंतीची स्पर्धा बनली आहे. या स्पर्धेमध्ये भारत आणि परदेशातील अनेक खेळाडू खेळले आहेत. यापैकी बर्याच खेळाडूंनी स्वत: चे नाव कमावले आहे तर काही खेळाडूंनी आपल्या राष्ट्रीय संघात जागा मिळवली आहे.
टी-२० स्पर्धा आता विविध देशांत खेळली जाते, दरम्यान, त्या स्पर्धांमध्ये असे बरेच खेळाडू आहेत ज्यांचे मोठे नाव आहे. आयपीएल स्पर्धेतही ते खेळाडू आज पर्यंत खेळात राजाळे असते तर ते नक्कीच सुपरहिट ठरले असते, परंतु काही कारणास्तव त्या खेळाडूंना ही स्पर्धा सोडावी लागली. तर या लेखात त्या ५ परदेशी खेळाडूंबद्दल जाणून घेऊया जे आज आयपीएलमध्ये सतत खेळत असते तर सुपरहिट झाले असते.
आयपीएलमध्ये सतत खेळले असते तर हे ५ परदेशी खेळाडू पाडू शकले असते आपली छाप
मशरफे मुर्तझा (Mashrafe Murtaza)
बांगलादेश क्रिकेट संघातील काही मोजकेच खेळाडू आयपीएलमध्ये खेळले आहेत. आयपीएलमध्ये खेळणार्या बांगलादेशी खेळाडूंपैकी शाकिब अल हसन हे एक नाव आयपीएलमध्ये हिट झाले. याशिवाय बांगलादेशचा दिग्गज खेळाडू ममशरफे मुर्तझा आयपीएल २००९ मध्ये खेळला आहे. आयपीएलमध्ये मशरफे मुर्तझा केकेआर संघाचा सदस्य होता.
आयपीएलमधील मशरफे मुर्तझाची कामगिरी इतकी खास नव्हती, त्याला एक सामना खेळण्याची संधी मिळाली त्यानंतर त्याला कधीच खेळायची संधी मिळाली नाही. त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दल बोलायचे तर तो जबरदस्त गोलंदाज होता. जर त्याला सतत आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली असती तर तो एक सुपरहिट खेळाडू नक्कीच ठरला असता.
मिशेल स्टार्क (Mitchell Starc)
इंडियन प्रीमियर लीगमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंचेही विशेष नाव आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडू सुरुवातीपासूनच आयपीएलमध्ये खेळत आहेत, त्यातील बऱ्याच खेळाडूंनी आपली खास छाप सोडली आहे. या ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये मिशेल स्टार्कचेही मोठे नाव आहे. मिचेल स्टार्क हा सध्याच्या ऑस्ट्रेलिया संघाचा प्रमुख गोलंदाज आहे.
स्टार्कला आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळण्याची संधी मिळाली. २०१५ पर्यंत तो आरसीबीकडून खेळला. या काळात स्टार्कने २७ सामन्यांत ३४ बळी घेतले. त्यानंतर त्याचे नाव आयपीएलपासून दूर गेले. परंतु केकेआरने २०१९ मध्ये त्याला विकत घेतले असले तरी तो स्वतः खेळला नाही. जर स्टार्क आयपीएलमध्ये खेळत राहिला असता तर तो आज आयपीएलचा जबरदस्त गोलंदाज झाला असता.
शेन बाँड (Shane Bond)
न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज शेन बाँड हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले मोठे नाव आहे. त्याने न्यूझीलंड संघातून बरीच वर्षे क्रिकेट खेळले. त्यालाही आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली. आयपीएलमध्ये शेन बाँडला कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने २०१० मध्ये संधी दिली.
बॉन्डला केकेआरसाठी ८ सामने खेळण्याची संधी मिळाली. ज्यामध्ये त्याने ९ गडी बाद केले. त्यानंतर शेन बाँडला आयपीएलमध्ये खेळण्याची कधीही संधी मिळाली नाही. जर या गोलंदाजांना संधी मिळाली असती तर आयपीएलचा एक महान गोलंदाज म्हणून नाव झाले असते.
दिमित्री मास्करेन्हास (Dimitri Mascarenhas)
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काही फलंदाजांनी एका षटकात ६ चेंडूत ६ षटकार ठोकले आहेत. या फलंदाजांमध्ये युवराज सिंगचे नाव आहे. पण युवराज सिंगच्या एका षटकात पाच षटकार ठोकण्याचा विक्रम इंग्लंडच्या या माजी अष्टपैलू दिमित्री मस्करेन्हासने केले आहे. त्याचवेळी तो एक अष्टपैलू असल्याचे सिद्ध झाले होते.
आयपीएलमध्ये याच कारणास्तव त्याला संधी मिळाली. इंग्लंडच्या अष्टपैलू खेळाडूने २००८ ते २०१३ या हंगामात आयपीएल सामने खेळले. यात केवळ १३ सामने खेळले आणि ७९ धावा केल्या आणि गोलंदाजीत १९ बळी घेतले. तो एक अष्टपैलू खेळाडू होता, परंतु त्यानंतर कोणत्याही संघाने त्याला संधी दिली नाही, नाहीतर आज ते एक मोठे नाव ठरले असते.
जोहान व्हॅनडर वाथ (Johan Vander Wath)
दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू जोहान व्हॅनडर वाथ यालाही आयपीएल २०११ मध्ये संधी मिळाली होती. वनडे सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण अफ्रिकेच्या संघाने ४३४ धावांची विशाल धावसंख्या पार करण्याच्या विश्वविक्र केला होता त्यात जोहाननेही आपले योगदान दिले होते.
त्या सामन्यात जोहानने १ चौकार आणि ३ शतकारांच्या मदतीने १८ चेंडूत ३५ धावा केल्या. या व्यतिरिक्त जोहान वाथने बर्याच वेळा चमकदार कामगिरी केली. यामुळे आयपीएलमध्ये आरसीबीने त्याला विकत घेतले. जोहान व्हॅनडर वाथला आरसीबीने केवळ ३ सामने खेळण्याची संधी दिली आणि त्यानंतर त्याला कधीही संघात घेतले नाही. जर जोहान व्हॅनडर वाथ आयपीएलमध्ये नियमित सामने खेळला असता तर त्याने या स्पर्धेमध्ये मोठी छाप सोडली असती.






