पुणे, 16 मार्च 2024: संजना होरोने तिचा सर्वोत्तम फॉर्म कायम ठेवत आणखी एका हॅटट्रिकसह 5 गोल केल्याने हॉकी बंगालने तेलंगणा हॉकीचा 11-0 असा धुव्वा उडवत पूल एचमध्ये अपराजित राहताना 14व्या हॉकी इंडिया सीनियर महिला राष्ट्रीय स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान पटकावले.
मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम नेहरूनगर, पिंपरी येथे झालेल्या सामन्यांत शनिवारी एकतर्फी लढतीत, संजनाने चौथ्या, 20व्या, 21व्या, 38व्या आणि 44व्या मिनिटाला असे पाच गोल करताना सुस्मिता पन्नाने (सहाव्या, 10व्या, 42व्या मिनिटाला) तीन, मोनिका नागने (सातव्या, 40व्या मिनिटाला) आणि कर्णधार अंजना डुंगडुंग (पाचव्या मिनिटाला) एकगोल करताना सांघिक खेळ उंचावण्यात मोलाची भूमिका बजावली.
संजनाने यापूर्वी हॉकी गुजरातविरुद्ध तब्बल आठ गोल केले होते.
हॉकी बंगालने सर्व सामने जिंकण्याची करामत साधताना पूल एचमध्ये नऊ गुणांसह अव्वल स्थान पटकावले. तसेच पुढील फेरीत दिमाखात स्थान मिळवले. या पुलमध्ये तमिळनाडू आणि हॉकी गुजरातच्या हॉकी युनिट संघांचाही समावेश आहे.
तथापि, पूल सी गटात हॉकी आंध्र प्रदेशवर 11-2 अशी मोठ्या फरकाने मात करूनही उत्तर प्रदेश हॉकीचे आव्हान गटवार साखळीतच संपुष्टात आले.
अनुभवी वंदनिया कटारियाची (43, 50, 55व्या मिनिटाला) गोल हॅट्ट्रिक, मुमताज खान (27 आणि 47व्या मिनिटाला) आणि उपासना सिंगच्या (35 आणि 46व्या मिनिटाला) प्रत्येकी दोन गोल आणि शशिकला (14 व्या मिनिटाला), रीतू सिंग (27व्या मिनिटाला), स्वर्णिका रावत (38व्या मिनिटाला) आणि सिमरन सिंगच्या (57व्या मिनिटाला) प्रत्येकी एक गोलच्या जोरावर उत्तर प्रदेश हॉकीने दोन आकडी गोल केले.
हॉकी आंध्र प्रदेशसाठी कल्याणी स्वर्णपूडी (7व्या मिनिटाला) आणि गारलंका वराहलम्मा (57व्या मिनिटाला) यांनाच गोल करता आला.
पूल सी मध्ये उत्तर प्रदेश हॉकी आणि हॉकी झारखंडने एक विजय आणि एका ड्रॉसह प्रत्येकी चार गुणांसह दुसरे स्थान मिळवले. मात्र, सरस गोलफरकाच्या जोरावर या पूलमधून हॉकी झारखंड संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरला.
दिवसभरातील अन्य लढतींमध्ये, दिल्ली हॉकीने केरळ हॉकीचा 4-1 असा पराभव केला. परंतु , हॉकी महाराष्ट्राला मागे टाकण्यात त्यांना अपयश आले. यजमानांनी त्यांच्या दोन्ही सामन्यांत दोन विजय मिळवला आहेत.
सोनालीने (37 आणि 59व्या मिनिटाला) दोन तर तान्या (21व्या मिनिटाला) आणि मानसीने (54व्या मिनिटाला) दिल्लीसाठी प्रत्येकी एक गोल केला. केरळ हॉकीकडून एकमेव गोल स्वेथाने (33व्या मिनिटाला) केला आहे.
पूल ए मध्ये अन्य सामन्यात, छत्तीसगड हॉकीने दोन सामन्यांमध्ये पहिला विजय नोंदवताना हॉकी बिहारला 2-0 असे पराभूत केले.
छत्तीसगड हॉकीकडून अनिशा साहू (आठव्या मिनिटाला) आणि आंचल साहूने (51व्या मिनिटाला) प्रत्येकी एक गोल केला.
मात्र, हॉकी महाराष्ट्राच्या मागे दुसरे स्थान मिळाल्याने छत्तीसगड हॉकीला बाद फेरीत पोहोचण्यासाठी हा विजय पुरेसा नव्हता.
आतापर्यंत हॉकी मध्य प्रदेश, हॉकी झारखंड, हॉकी महाराष्ट्र आणि हॉकी बंगालने उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले आहे.
अन्य सामन्यात हॉकी मिझोरामने हॉकी हिमाचलला 10-0 असे रोखले
निकाल :पूल एच: हॉकी बंगाल: 11 (संजना होरो चौथ्या मिनिटाला पीसी, 20, 21; 38, 44व्या मिनिटाला; अंजना डुंगडुंग पाचव्या मिनिटाला, पीसी; सुष्मिता पन्ना सहाव्या, नवव्या, 42व्या; मोनिका नाग सातव्या, 40व्या मिनिटाला) विजयी वि. तेलंगणा हॉकी: 0. हाफटाईम-7-0.
पूल-बी: दिल्ली हॉकी: 4 (तान्या 21व्या मिनिटाला; सोनाली 37व्या, 59व्या मिनिटाला; मानसी 54व्या मिनिटाला) विजयी वि. केरळ हॉकी: 1 (स्वेथा 33व्या मिनिटाला). हाफटाईम: 1-0
पूल-ए: छत्तीसगड हॉकी: 2 (8 अनिशा साहू आठव्या मिनिटाला, पीसी; आंचल साहू 51व्या मिनिटाला) विजयी वि. हॉकी बिहार:0. हाफटाईम – 1-0.
पूल-सी: उत्तर प्रदेश हॉकी: 11 (शशिकला 14व्यामिनिटाला; रीतू सिंग 27व्या मिनिटाला पीसी; मुमताज खान 27,, 47व्या मिनिटाला; उपासना सिंग 35, 46व्या मिनिटाला, पीसी; स्वर्णिका रावत 38व्या मिनिटाला; वंदना कटारिया 43 आणि 50व्या मिनिटाला पीसी, सिमरन 57व्या मिनिटाला, पीसी) विजयी वि. हॉकी आंध्र प्रदेश: 2 (कल्याणी स्वर्णपूडी सातव्या मिनिटाला; गरलंका वराहलम्मा 57व्या मिनिटाला पीसी). हाफटाईम: 3-1
शुक्रवारी:
पूल-एफ: हॉकी मिझोरम: 10 (लालहलुनमावी 12व्या मिनिटाला, पीसी; एच. लालरुआतफेली 29व्या मिनिटाला, पीसी, 48, 54 आणि 56व्या मिनिटाला; लालरुआतफेली 37व्या मिनिटाला, पीसी; लालरेमसियामी 47व्या मिनिटाला, पीसी; लालपेकसंगी 49व्या मिनिटाला, पीसी; 53व्या मिनिटाला, मरिना लालरामंघंकी 59व्या मिनिटाला, पीसी) विजयी वि. हॉकी हिमाचल : 0. हाफटाईम: 2-0.
महत्वाच्या बातम्या –
शिअरफोर्स आंतरमहाविद्यालयीन स्पोर्ट्स लीगमध्ये पद्मभूषण डॉ.वसंतदादा पाटील कॉलेजचा विजय
धनश्री वर्मा’घरच्यांना यामुळे फरक पडतोय…’, ट्रोलर्सवर संतापली धनश्री वर्मा, वाचा काय आहे प्रकरण