---Advertisement---

IPL फायनलमध्ये ‘हे’ ५ खेळाडू गाजवू शकतात मैदान, सर्वांच्या असतील त्यांच्यावर नजरा

On: रविवार, मे 29, 2022 6:16 PM
RR-vs-GT-Team
---Advertisement---

इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) २०२२चा अंतिम सामना गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्तान रॉयल्स असा खेळला जाईल. हा सामना २९ मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम येथे होणार आहे. या सामन्यापूर्वी अनेक चर्चांना उधाण आलं आहे. आयपीएलच्या अंतिम सामन्यात दोन्ही संघांवर बरोबरीचा दबाव असतो. अशा सामन्यांत दिग्गज खेळाडूंना आपला अनुभव सत्कारणी लावण्याची संधी असते. या सामन्यांत देखील दोन्ही संघातून मिळून पाच खेळाडूंवर विशेष नजर असणार आहे.

१. शुबमन गिल (Shubhman Gill)

gill
Photo Courtesy : iplt20.com

शुबमन गिल अंतिम सामन्यासाठी मोठा दावेदार ठरू शकतो. त्याने आतापर्यंत १५ सामन्यांत ४३८ धावा केल्या आहेत, ज्यात चार अर्धशतकांचा समावेश आहे. वेगवान गोलंदाजीविरुद्ध गिल चांगला खेळत आहे. अशा परिस्थितीत प्रसिद्ध कृष्णा आणि ट्रेंट बोल्ट त्यांना अडचणीत आणू शकणार नाहीत. त्याने राजस्थानविरुद्ध खेळलेल्या ११ सामन्यात २४६ धावा केल्या आहेत. याच हंगामात राजस्थानविरुद्धच्या दोन डावांत त्याने अनुक्रमे १३ आणि ३५ धावा केल्या आहेत.

२. मोहम्मद शमी (Mohammad Shami)

Mohammad Shami
Phot courtesy : iplt20.com

राजस्थानविरुद्धच्या ११ सामन्यांमध्ये मोहम्मद शमीने ९ च्या इकॉनॉमीने १४ विकेट घेतल्या आहेत. त्याच वेळी, हंगामाबद्दल बोलताना, त्याने लीग टप्प्यात राजस्थानविरुद्ध १/३९ आणि १/४३ अशी कामगिरी केली. सर्वांच्या नजरा शमीवर आहेत, कारण तो मोठ्या सामन्यांमध्ये निर्णायक गोलंदाजी करतो. या हंगामाबद्दल त्याने १५ सामन्यात १९ विकेट घेतल्या आहेत. 

३. जॉस बटलर (Jos Buttler)

Jos- Butler
Photo Courtesy : iplt20.com

बटलरने या हंगामात गुजरात टायटन्सविरुद्ध दोन सामने खेळले असून, त्याने ७१ च्या सरासरीने १४३ धावा केल्या आहेत. दोन्ही सामन्यात अर्धशतके. त्याची सर्वोत्तम धावसंख्या ८९ धावा आहे. बटलर या हंगामात ८२४ धावा करून चर्चेत आहे. डेव्हिड वॉर्नरचा एका हंगामात सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्याची त्याला संधी आहे. वॉर्नरने २०१६ च्या हंगामात ८४८ धावा केल्या तर बटलरने आतापर्यंत ८२४ धावा केल्या आहेत.

४. शिमरॉन हेटमायर (Shimron Hetmayer)

Shimron Hetmayer
Photo Courtesy : iplt20.com

गुजरातविरुद्ध स्ट्राइक रेट १५१ च्या वर असल्याने हेटमायरवरही विशेष लक्ष असेल. राजस्थानविरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन सामन्यात त्याने ७४ धावा केल्या आहेत. या हंगामाबद्दल बोलायचे झाले, तर त्याने १४ सामन्यांत ३०३ धावा केल्या आहेत, तर सात वेळा नाबाद राहिले आहेत. त्याचा स्ट्राइक रेट १५७ आहे. गुजरातचा फिरकीपटू राशिद खानची जादू मोडण्यात हेटमायर यशस्वी होऊ शकतो. हेटमायरने रशीदच्या चेंडूंवर १४५ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या.

५. युझवेंद्र चहल (Yuzavendra Chahal)

Yuzvendra-Chahal
Photo Courtesy: iplt20.com

यंदाच्या हंगामातील सर्वात यशस्वी गोलंदाज युझवेंद्र चहलवर सर्वांच्या नजरा असतील. पर्पल कॅपच्या शर्यतीत हसरंगासह पहिल्या क्रमांकावर असलेला चहल गुजरातविरुद्धच्या सामन्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करेल. मोठ्या सामन्यांचा खेळाडू आणि विशेषत: या हंगामात आपल्या फिरकी गोलंदाजीने सर्वांना प्रभावित करणारा चहल गुजरातविरुद्ध प्रभावी ठरला आहे. मोसमात गुजरातविरुद्ध त्याची १/३२, ०/३२ अशी कामगिरी आहे. तसे पाहता त्याने गुजरातविरुद्धच्या १३ सामन्यांत आतापर्यंत १८ बळी घेतले आहेत.

व्हॉट्स्पवर अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा

IPL Final | गुजरात वि. राजस्थान सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!

IPL फायनलच्या तिकीटाचे दर पाहून म्हणाल आपला टीव्हीच बरा

IPL च्या समारोपाची जंगी तयारी; मोदी, शहांच्या उपस्थितीत ‘हे’ सेलिब्रेटी करणार परफॉर्मन्स

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---