इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात यशस्वी टी20 लीगमध्ये गणली जाते. आयपीएलला जगातील सर्वात महागड्या लीगचा दर्जा देखील आहे. प्रत्येक देशाचे युवा आणि दिग्गज खेळाडू या लीगमध्ये खेळण्यास उत्सुक असतात. मात्र त्यापैकी काही निवडक खेळाडूंनाच संधी मिळते.
आयपीएलमध्ये असे अनेक खेळाडू आहेत. ज्यांनी आतापर्यंत 17 हंगामात वेगवेगळ्या फ्रँचायझींचे प्रतिनिधित्व केले आहे. या काळात असे काही भारतीय खेळाडू घडले आहेत. जे फक्त एकाच संघाकडून खेळताना दिसले. जास्त किंमत (पैसे) मिळूनही त्यांनी संघ सोडण्याचा विचार केला नाही. या बातमीद्वारे आपण अशा 5 भारतीय खेळाडूंचा उल्लेख करणार आहोत, जे आताप्रर्यंत आयपीएलमध्ये फक्त एकाच संघासाठी खेळले आहेत.
5. पृथ्वी शॉ
युवा फलंदाज पृथ्वी शॉने त्याच्या नेतृत्वाखाली 2018 मध्ये भारताला अंडर-19 विश्वचषक जिंकून दिला होता. त्या वर्षी झालेल्या आयपीएल लिलावात दिल्ली कॅपिटल्सने त्याला करारबद्ध केले आणि तो अजूनही डीसी संघाचा एक भाग आहे. त्याच्या कारकिर्दीत त्याने 79 सामने खेळले असून 23.95 च्या सरासरीने 1892 धावा केल्या आहेत.
4. रिषभ पंत
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतही दीर्घकाळापासून दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीचा भाग आहे. सध्या तो संघाचा कर्णधारही आहे. दिल्लीने 2016 मध्ये रिषभ पंतला त्यांच्या संघाचा भाग बनवले आणि आजपर्यंत त्याने ही फ्रेंचायझी सोडलेली नाही. पंतने आतापर्यंत खेळलेल्या 111 सामन्यात 3284 धावा केल्या आहेत.
3. सचिन तेंडुलकर
क्रिकेटचा देव म्हणजेच सचिन तेंडुलकर त्याच्या आयपीएल कारकिर्दीत फक्त मुंबई इंडियन्सकडून खेळला. त्याची आयपीएल कारकीर्द 6 वर्षे चालली. दरम्यान तेंडुलकरने 78 सामने खेळले आणि 34.84 च्या सरासरीने 2334 धावा केल्या.
2. जसप्रीत बुमराह
भारतीय संघाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची कमाल आयपीएलमध्येही पाहायला मिळते. मेगा लिलावात बुमराह संघात सामील होण्याची फ्रेंचायझी वाट पाहत आहेत. परंतु मुंबईने त्याला आधीच कायम ठेवले आहे. या उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने 2013 मध्ये एमआयकडून खेळून त्याच्या आयपीएल कारकिर्दीला सुरुवात केली आणि अजूनही तो संघाचा एक भाग आहे.
1. विराट कोहली
आयपीएलच्या सुरुवातीपासून विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू फ्रँचायझीचा भाग आहे. किंग कोहलीने असेही म्हटले आहे की तो आयपीएलमध्ये आरसीबीव्यतिरिक्त इतर कोणत्याही फ्रेंचायझीसाठी कधीही खेळणार नाही. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही कोहलीच्या नावावर आहे. विराट कोहली आरसीबीशी 2008 पासून जोडला आहे.
हेही वाचा-
लखनऊ रोहितला खरेदी करण्यास उत्सुक? कोच जॉन्टी रोड्सचा मोठा दावा
चेन्नई सुपर किंग्जच्या दिग्गजाची निवृत्तीची घोषणा, या मोसमात खेळणार शेवटचा सामना
जो रूटची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 शतकं पूर्ण…! अशी कामगिरी करणारा कितवा खेळाडू?