क्रिकेट हा सभ्य माणसांचा खेळ म्हणजेच ‘जंटलमन्स गेम’ मानला जातो. खेळाडू अनेकदा मैदानावर आपल्या वर्तणूकीने विरोधी खेळाडू व चाहत्यांच्या मनात आपली प्रतिमा उंचावतात. भारतीय खेळाडू याबाबतीत नेहमी आघाडीवर असतात. आज आपण अशा तीन घटनांविषयी जाणून घेणार आहोत, ज्यावेळी भारतीय खेळाडूंनी खिलाडूवृत्ती दाखवत विरोधी संघातील खेळाडूंना मदत केली होती.
राहुल द्रविड खेळला स्कॉटलंडसाठी
भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू व माजी कर्णधार राहुल द्रविड क्रिकेट इतिहासातील सर्वात सभ्य क्रिकेटपटू मानला जातो. आजही त्याच्या सभ्यतेचे दाखले दिले जातात. स्कॉटलंड संघ २००३ विश्वचषकानंतर सचिन तेंडुलकरकडून प्रशिक्षण घेऊन इच्छित होता. मात्र, काही कारणास्तव सचिन तेथे जाऊ न शकल्याने भारतीय प्रशिक्षक जॉन राईट यांनी राहुल द्रविडला पाठवले. द्रविडने स्कॉटलंडकडून ११ एकदिवसीय सामने खेळले आणि ६०० धावा केल्या. अर्थातच असे म्हटले जाऊ शकते की, स्कॉटलंड क्रिकेट संघातील खेळाडूंना ड्रेसिंग रूम द्रविडसारख्या महान व्यक्तीबरोबर वेळ घालविण्याचा अनुभव मिळाला होता.
मनदीप दिसला दक्षिण आफ्रिकेसाठी क्षेत्ररक्षण करताना
भारताचा सलामीवीर मनदीप सिंग २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिका संघासाठी क्षेत्ररक्षण करताना दिसून आला. दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आला असताना खेळाडूंना पोटदुखीचा त्रास होत होता. संघावर एकवेळ परिस्थिती अशी आली की, सराव सामन्यात खेळण्यासाठी संघाकडे ११ खेळाडू उपलब्ध नव्हते. त्यावेळी भारतीय संघात निवडलेला मनदीप सिंग दक्षिण आफ्रिकेची जर्सी घालून क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला. मनदीपने भारतासाठी तीन टी२० सामने खेळले आहेत.
सचिनने खेळला होता पाकिस्तानसाठी
क्रिकेटजगतातील सर्वात महान फलंदाज सचिन तेंडुलकरची ओळख भारतीय आहे. मात्र, कदाचित खूप कमी जणांना माहित असेल की, सचिनने भारतीय संघासाठी पदार्पण करण्याआधी पाकिस्तानसाठी मैदानावर हजेरी लावलेली. मुंबईतील एका सामन्यात जावेद मियादाद व अब्दुल कादीर मैदानाबाहेर गेल्याने सचिनला क्षेत्ररक्षणास येण्याची विनंती केली गेली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
बॉल टॅम्परिंग प्रकरणाची हवा तापली, स्टुअर्ट ब्रॉडने वॉर्नरला मारला ‘हा’ टोला
टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज, ‘या’ भारतीय खेळाडूंचा आहे दबदबा