---Advertisement---

आयपीएल २०२१ मध्ये होता ‘या’ ५ खेळाडूंचा बोलबाला, आता टी२० विश्वचषकातील कामगिरीवर असेल सर्वांचे लक्ष

On: शुक्रवार, ऑक्टोबर 22, 2021 1:50 PM
---Advertisement---

आयपीएल टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धा सुरू झाली आहे. यूएई आणि ओमानमध्ये सुरु असलेली ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आयपीएल २०२१ स्पर्धेचा थरार पाहायला मिळाला होता. आयपीएल २०२१ स्पर्धेत अनेक खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली. आता हेच खेळाडू टी-२० विश्वचषक स्पर्धेत जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. चला तर पाहूया असे ५ खेळाडू जे आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेत जोरदार कामगिरी करू शकतात.

सहा वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू टाकणारा वरूण चक्रवर्ती
‘मिस्ट्री गोलंदाज’ म्हणून ओळखला जाणारा वरून वरून चक्रवर्ती ६ वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू टाकू शकतो. त्याने आयपीएल २०२१ स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या सराव सामन्यात तो साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरला असला तरीदेखील त्याने आयपीएल २०२१ स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली होती. त्याने या हंगामात एकूण १७ सामने खेळले. ज्यामध्ये त्याला १८ गडी बाद करण्यात यश आले आहे.

केएल राहुलने ठोकल्या ६२६ धावा 
पंजाब किंग्स संघाचा कर्णधार केएल राहुल आयपीएल २०२१ चा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज राहिला होता. परंतु अंतिम अंतिम सामन्यात ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिसने त्याला मागे टाकले आहे. आयपीएल २०२१ स्पर्धेत त्याने तुफान फटकेबाजी करत ६०० पेक्षा अधिक धावा केल्या. त्याने १३ सामन्यात ६३६ धावा केल्या. तसेच आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेच्या सराव सामन्यांमध्ये देखील केएल राहुलने अप्रतिम फलंदाजी केली होती. त्यामुळे या स्पर्धेत देखील त्याच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा असणार आहे.

रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघ तिसऱ्या स्थानी 
रिषभ पंत आयपीएल २०२१ स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत १० व्या स्थानी आहे. त्याने १६ डावात ४१९ धावा केल्या होत्या. त्याला दिल्ली कॅपिटल्स संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती. ही जबाबदारी त्याने योग्यरीत्या पार पाडली होती. आता तो पहिल्यांदाच टी -२० विश्वचषक स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. त्यामुळे त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

शेवटच्या क्षणी शार्दुल ठाकूरला भारतीय संघात संधी 
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला देखील आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी मुख्य संघात स्थान देण्यात आले आहे. सुरुवातीला त्याची निवड राखीव खेळाडू म्हणून करण्यात आली होती. परंतु शेवटच्या क्षणी अक्षर पटेलच्या जागी शार्दुल ठाकूरला संघात स्थान देण्यात आले. तर अक्षर पटेलला राखीव खेळाडू म्हणून संधी देण्यात आली. त्याने आयपीएल २०२१ स्पर्धेच्या १६ सामन्यात एकूण २१ गडी बाद केले होते. आता हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे की, या संधीचा तो कसा फायदा घेतो?

केकेआरला अंतिम फेरीत पोहचवण्यात लॉकी फर्ग्युसनचे मोलाचे योगदान 
कोलकाता नाईट रायडर्स संघाला आयपीएल २०२१ स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचवण्यात लॉकी फर्ग्युसनने अमूल्य योगदान दिले आहे. त्याने ८ सामन्यात १३ गडी बाद केले होते. लॉकी फर्ग्युसन पहिल्यांदाच टी -२० विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ ३ संघांची सुपर १२ फेरीत दिमाखात एन्ट्री, आयर्लंड वि. नामबिया सामन्यावर निर्भर असेल चौथी टीम

शाहरुख, प्रीतीनंतर आता बॉलिवूडची ‘ही’ जोडी आयपीएलमध्ये करणार गुंतवणूक, नव्या फ्रँचायझीवर लावणार बोली!

ट्रिंग ट्रिंग.. त्याची निवड करा; धोनीच्या एका फोन कॉलमुळे ‘या’ भारतीय शिलेदाराची टी२० विश्वचषक संघात वर्णी?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---