---Advertisement---

२० वर्षीय रिषभ पंत तिसऱ्या कसोटीत चमकला, केला मोठा पराक्रम

On: सोमवार, ऑगस्ट 20, 2018 2:22 PM
---Advertisement---

नॉटिंगघम। इंग्लंड विरुद्ध भारत संघात ट्रेंटब्रिज मैदानावर सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताकडे २९२ धावांची मोठी आघाडी आहे.

इंग्लंडचा पहिला डाव १६१ धावांतच कोलमडला. यामुळे भारताने पहिल्या डावात १६८ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर भारताने दुसऱ्या डावात दुसऱ्या दिवसाखेर २ बाद १२४ धावा केल्या.

या सामन्यातील इंग्लंडच्या पहिल्या डावात हार्दिक पंड्याने ६ षटकांत २८ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. त्याच्या या कारनाम्यामुळे मात्र एका मोठ्या विक्रमाकडे दुर्लक्ष झाले.

याच डावात आपला पहिलाच सामना खेळत असलेल्या यष्टीरक्षक रिषभ पंतने चक्क स्टंपपाठीमागे ५ विकेट्स घेतल्या. त्याने या डावात चक्क ५ झेल हे स्टंपपाठीमागे घेतलेय

यामुळे पदार्पणाच्या सामन्यात अशी कामगिरी करणारा तो जगातील ६वा तर पहिल्या डावातच अशी कामगिरी करणारा केवळ दुसरा यष्टीरक्षक ठरला.

१९९९ नंतर पदार्पणात कोणत्याही यष्टीरक्षकाने ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या नाहीत. शिवाय पदार्पणात अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.

याच सामन्यात या प्रतिभावान खेळाडूने पहिल्या डावात ५१ चेंडूत २४ धावा केल्या.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

-…तरच टीम इंडिया घडविणार तिसऱ्या कसोटीत इतिहास

-भारतीय महिला कबड्डी संघाचा दुसरा विजय, जाणून घ्या महिला कबड्डीचे दुसऱ्या दिवसाचे सर्व निकाल

एशियन गेम्स: बजरंग पुनियाने मिळवून दिले भारताला पहिले सुवर्णपदक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment