१३३ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासात बर्याच दिग्गज क्रिकेटपटूंनी त्यांच्या खेळातील दमदार कामगिरीने साऱ्यांचे मनोरंजन केले आहे. जागतिक क्रिकेटमध्ये जेवढे खेळाडू क्रिकेट खेळले आहेत त्यांचं एकदा तरी आपल्या देशाचे नेतृत्त्व करण्याचं स्वप्न असतं.
बहुतेकवेळा काही क्रिकेटपटूंना नियमित कर्णधाराच्या अनुपस्थिती प्रभारी नेतृत्व सांभाळण्याची संधी मिळते. पण क्रिकेटमध्ये असेही काही दिग्गज खेळाडू झाले, ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली मात्र त्यांना कधीही संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही.
५. जेम्स अँडरसन (James Anderson)
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासातील एक महान वेगवान गोलंदाज आहे. तो स्विंग गोलंदाजीसाठी खूप प्रसिद्ध आहे. या वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अतुलनीय यश संपादन केले आहे.
डिसेंबर २००२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर अँडरसनने १५१ कसोटी, १८४ वनडे आणि १९ टी-२० सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने कसोटीत ५८७, वनडेत २६९ आणि आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये १८ बळी घेतले आहेत. तो इंग्लंडकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. तो अजूनही कसोटी क्रिकेटमध्ये सक्रिय आहे.
पण इंग्लंड संघासाठी जोरदार कामगिरी करूनही अँडरसनला इंग्लंड संघाचे नेतृत्व करण्याची कोणतीही संधी मिळविली नाही.
४. मॅथ्यू हेडन (Matthew Hayden)
एखादा महान फलंदाज राष्ट्रीय संघाचे नेतृत्व बऱ्याचदा करतो. परंतु, ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनला त्याच्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत कर्णधारपद मिळाले नाही. हा डावखुरा सलामीवीर फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक होता.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासातील ऑस्ट्रेलियन सलामीवीर म्हणून तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज (१४८२५ धावा) आहे. हेडनने १९९३-२००९ दरम्यान ऑस्ट्रेलियासाठी योगदान दिले. या डावखुरा फलंदाजाने १०३ कसोटींमध्ये ५०.७३ च्या सरासरीने ८६२५ धावा, १६१ वनडे सामन्यात ४३.८० च्या सरासरीने ६१३३ धावा आणि ९ टी-२० मध्ये ५१.३३ च्या सरासरीने ३०८ धावा केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत हेडनने एकूण ४० शतके (कसोटी ३० शतके आणि १० वनडे शतके) आणि ६९ अर्धशतके (२९ कसोटी अर्धशतके, ३६ वनडे अर्धशतके आणि ४ टी-२० अर्धशतक) ठोकले आहेत.
ऑक्टोबर २००३ मध्ये हेडनने कसोटी सामन्यात सर्वोच्च ३८० धावांची वैयक्तिक खेळी पर्थ येथे झिम्बाब्वेविरुद्ध केली होती. २००३ आणि २००७ मध्ये ऑस्ट्रेलियाने आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा जिंकली. त्यात हेडननेही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. परंतु, ऑस्ट्रेलियन संघाचे कर्णधारपद त्याने कधी अनुभवले नाही.
३. युवराज सिंग (Yuvraj Singh)
माजी भारतीय अष्टपैलू युवराज सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासातील एक महान आणि यशस्वी अष्टपैलू खेळाडू होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोच्च पातळीवरील यश त्याने मिळवले. त्याने भारतासाठी २००७ च्या टी२० विश्वचषकात आणि २०११ वनडे विश्वचषकात भारतीय संघासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
युवराजने २००० ते २०१७ या कालावधीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले, त्याने ४० कसोटी सामने, ३०४ वनडे आणि ५८ टी-२० सामने खेळले. फलंदाजीत त्याने कसोटीमध्ये ३३.९२ च्या सरासरीने १९०० धावा, वनडेमध्ये ३६.५५ च्या सरासरीने ८७०१ धावा आणि टी२० मध्ये २८.०२ च्या सरासरीने ११७७ धावा केल्या.
डावखुरा फिरकीपटू म्हणून युवराजने ९ कसोटी विकेट्स, १११ वनडे विकेट्स आणि २८ टी-२० विकेट्स मिळविले आहेत. मात्र त्याला कर्णधारपदाचा अनुभव घेता आला नाही. त्याने जून २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
४. ग्लेन मॅकग्रा (Glenn McGrath)
वेगवान गोलंदाजांसाठी राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्याच्या घटना कमी घडल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा हे त्याचे आणखी एक उदाहरण आहे. या वेगवान गोलंदाजाने बऱ्याच वर्षे आपल्या गोलंदाजीने वर्चस्व राखले, परंतु ऑस्ट्रेलियन कर्णधारपद त्याला कधीही मिळाले नाही.
मॅकग्रा १९९३-२००७ या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. त्याने १२४ कसोटी सामन्यांत ५७३ विकेट्स, २५० वनडे सामन्यांमध्ये ३८१ विकेट्स आणि २ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात ५ विकेट्स मिळविण्यात यश मिळवले. एकूण ३७६ आंतरराष्ट्रीय सामन्यात ९४९ विकेट्स मिळवणाऱ्या या गोलंदाजाने ऑस्ट्रेलिया संघाला आयसीसी क्रिकेट विश्वचषक आणि इतर अनेक ट्रॉफी जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला.
मात्र ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदासाठी मॅकग्राचा कधीही विचार केला गेला नाही.
५. मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan)
श्रीलंका संघाकडून मुथय्या मुरलीधरन या दिग्गज खेळाडूने बरेच आंतरराष्ट्रीय सामने खेळले. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रमही मुरलीधरनच्या नावावर आहे. परंतु, या दिग्गज ऑफ स्पिनर मुथय्या मुरलीधरनला श्रीलंकेच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या नेतृत्वाची संधी कधीही मिळविली नाही.
मुरलीधरनने १९९२ ते २०११ दरम्यान श्रीलंके संघासाठी महत्वपूर्ण योगदान दिले. त्याने एकूण ४९५ आंतरराष्ट्रीय सामने खेळले त्यात १३३ कसोटी, ३५० वनडे आणि १२ आंतरराष्ट्रीय टी२० सामान्यांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत त्याने एकूण १३४७ विकेट्स घेतल्या. त्याने कसोटीमध्ये सर्वाधिक ८०० विकेट्स, वनडेमध्ये ५३४ विकेट्स आणि टी२० मध्ये १३ विकेट्स घेतल्या.
१९९६ मध्ये आयसीसी क्रिकेट विश्वचषक श्रीलंकेने जिंकला. त्या विजयी संघातील तो युवा खेळाडू होता. त्या स्पर्धेत ६ सामन्यात ७ बळी मिळविण्यात यशस्वी झाला. श्रीलंकेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील यशासाठी त्याचे महत्वपूर्ण योगदान दिले असले, तरी या महान दिग्गज क्रिकेटपटूने कधीही राष्ट्रीय संघासाठी कर्णधाराची भूमिका निभावली नाही.
वाचनीय लेख –
चष्मा घालून खेळणारे १० दिग्गज क्रिकेटपटू
अशा १३ घटना जेव्हा शिवसेनेने केला भारत-पाकिस्तान सामन्यावेळी राडा
दमदार कामगिरीनंतरही भारतीय संघातून हे खेळाडू झाले अचानक गायब