आशिया कप 2025 (Asia Cup 2025) संदर्भात अनेक मोठ्या घडामोडी समोर आल्या आहेत. स्पर्धेची सुरुवात 10 सप्टेंबरपासून होण्याची शक्यता आहे. यंदा स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्येच होईल, असे मानले जात आहे. मात्र, स्पर्धा कुठे होणार याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. आशिया कपच यजमान पदाच्या शर्यतीत यूएईचे नाव सर्वात पुढे आहे. तरीदेखील, हायब्रिड मॉडेलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सामने खेळवून स्पर्धा घेण्याचा विचारही केला जात आहे.
क्रिकबझच्या माहितीनुसार, भारत आणि पाकिस्तानच्या टीमही आशिया कप 2025 मध्ये सहभागी होतील. रिपोर्टनुसार, स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा लवकरच एसीसीकडून केली जाऊ शकते. भारतीय संघाची धुरा सूर्यकुमार यादवकडे (Suryakumar yadav) असणार आहे.
टी-20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेतलेले रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यंदा आशिया कपमध्ये खेळताना दिसणार नाहीत.






