---Advertisement---

आशिया कप 2025 साठी भारतीय संघाच्या निवडीबाबत 5 मोठे अपडेट्स! ‘या’ स्टार खेळाडूचे होणार पुनरागमन?

On: सोमवार, जुलै 7, 2025 7:52 PM
---Advertisement---

5 big updates about the Indian team for the Asia Cup: आशिया कप 2025 साठी भारतीय संघाच्या निवडीबाबत 5 मोठे अपडेट्स समोर आले आहेत. आशिया कपची सुरूवात सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होऊ शकतो असे मानले जात आहे. स्पर्धेचे आयोजन यूएईमध्ये करण्याची तयारी केली जात आहे. पण, अद्याप याबाबत कोणतेही ठिकाण निश्चित झालेले नाही. टी20 फॉरमॅटमुळे या स्पर्धेत भारतीय संघाचे स्टार क्रिकेटर नेतृत्व सूर्यकुमार यादव करताना दिसणार आहे. (Suryakumar Yadav captain Asia Cup) तर अलिकडेच भारतीय संघाच्या कसोटी कर्णधारपदी नियुक्त झालेला युवा स्टार क्रिकेटर शुबमन गिल उपकर्णधाराची जबाबदारी सांभाळेल. (Shubman Gill vice-captain)

सलामीवीर म्हणून निवडकर्ते अभिषेक शर्मासोबत संजू सॅमसन किंवा शुबमन गिलवर विश्वास दाखवण्याच्या तयारीत आहेत. जर संजू आणि अभिषेकने डावाची सुरुवात केली, तर गिल तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसू शकतो. तर, सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर खेळताना दिसण्याची शक्यता आहे. (Abhishek Sharma Sanju Samson opener)

त्याच वेळी, आयपीएलमध्ये आपल्या कर्णधारपदाखाली पंजाब किंग्जला फायनलमध्ये नेणारा स्टार खेळाडू श्रेयस अय्यरचे टी20 संघात पुनरागमन जवळजवळ निश्चित मानले जात आहे. (Shreyas Iyer T20 comeback) तर तिलक वर्मा, रिंकू सिंग आणि हार्दिक पांड्या त्याला साथ देताना दिसतील. गोलंदाजीत जसप्रीत बुमराहला अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा साथ देताना दिसू शकतात. या दरम्यान आगामी आशिया कपसाठी निवडकर्ते कोणत्या खेळाडूंना संधी देतील. हे पाहणे देखील महत्वाचे ठरेल. (Team India selection Asia Cup)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---