---Advertisement---

रोहित शर्मा ते विराट कोहली: कसोटी क्रिकेटमध्ये पार्ट-टाइम गोलंदाजी करणारे ५ भारतीय क्रिकेटपटू

On: मंगळवार, फेब्रुवारी 9, 2021 7:18 AM
---Advertisement---

सन २००९ च्या आयपीएलच्या दुसऱ्या हंगामात कर्णधार ऍडम गिलख्रिस्टच्या नेतृत्वाखाली रोहित शर्मा डेक्कन चार्जर्स संघाकडून मैदानात उतरला होता. त्यावेळी या सामन्यात त्याने प्रेक्षकांना आपल्या गोलंदाजीने चांगलेच प्रभावित केले होते. त्या आयपीएलमध्ये हॅटट्रिकची किमया साधणारा रोहित हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. नुकत्याच चेन्नईमध्ये झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्माला जेव्हा गोलंदाजी करायची संधी दिली गेली तेव्हा त्याने १२ चेंडूमध्ये ७ धावा दिल्या.

इंग्लंड विरुद्धच्या चेन्नई कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाज हे विकेट्स मिळवण्याच्या धडपडीत होते त्यावेळी चहाचा ब्रेक होण्यापूर्वी भारतीय कर्णधार विराट कोहली याने पार्ट टाइम गोलंदाजी करण्याची संधी रोहित शर्माला दिली.

पार्ट-टाईम गोलंदाज म्हणजेच संघाच्या प्रमुख गोलंदाजांना काहीवेळासाठी विश्रांती मिळावी म्हणून एखाद्या खेळाडूला, जो प्रमुख गोलंदाज नसतो, त्याला काही षटके गोलंदाजी करण्यास सांगितले जाते. थोडक्यात तो एक त्याकाळासाठी कामचलाऊ गोलंदाज असतो.

१) महेंद्रसिंग धोनी

सन २०११ च्या कसोटीत इंग्लंड दौऱ्यात धोनीने काही षटके गोलंदाजी केली होती. त्यावेळी त्याने १० षटके टाकली होती. विशेष म्हणजे केविन पीटरसन याला त्याने आपल्या गोलंदाजीच्या जाळ्यात अडकवले देखील होते. परंतु डीआरएसमुळे तो निर्णय धोनीच्या विरोधात गेला. आपल्या कसोटी कारकिर्दीत धोनीने १६ षटके टाकली होती परंतु त्याला एकही विकेट मिळाली नाही.

२) विराट कोहली

विराट कोहली यानेदेखील अनेकदा गोलंदाजी केली आहे. २०११ ते २०१५ च्या काळात देखील त्याने काही षटके टाकली होती. दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर २०१७ साली त्याने पुन्हा श्रीलंकेविरुद्ध गोलंदाजीसाठी केली होती. त्यावेळी कसोटीत दोन षटके टाकली होती, परंतु त्यातदेखील विकेट हस्तगत करण्यास तो अपयशी ठरला.

३) गौतम गंभीर

भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने आपल्या कारकिर्दीत दोन षटके टाकली होती. २०१२ मध्ये नागपुरात इंग्लंडविरुद्धच्या अनिर्णित सामन्यात धोनीने गंभीरला ही संधी दिली होती. त्यावेळी आपल्या फिरकी गोलंदाजीने त्याने केवळ चार धावा दिल्या होत्या. आपल्या एकदिवसीय सामन्यांच्या कारकिर्दीत त्याने एक षटक देखील टाकले होते.

४) राहुल द्रविड

आपल्या कसोटी क्रिकेटच्या कारकिर्दीत राहुल द्रविडने चक्क एक किंवा दोन नव्हे तर २० षटके टाकली होती. द्रविडने वेस्ट इंडिजच्या ‘रिडले जेकब्स’ ला आपल्या गोलंदाजीने बाद केले होते. त्यावेळी जेकोब्सने २०६ चेंडूंमध्ये ११८ धावा काढल्या होत्या. विशेष म्हणजे या सामन्यात सर्वच खेळाडूंनी गोलंदाजी केली होती. त्यावेळी त्याचा इकोनॉमि १.९५ तर सरासरी ३९ इतकी होती.

५) व्ही. व्ही. एस लक्ष्मण

भारताचे माजी फलंदाज व्ही. व्ही. एस लक्ष्मणने देखील कसोटीमध्ये गोलंदाजी केलेली आहे. लक्ष्मणने आपल्या कारकिर्दीत ३२४ चेंडू टाकून १२६ धावा दिल्या आणि त्यासोबतच दोन विकेट्स देखील त्यांना प्राप्त झाल्या आहेत. त्यांची इकोनॉमी ही २.३३ इतकी असून सरासरी ६३ इतकी होती. लक्ष्मणने आपल्या कारकिर्दीत एकदिवसीय सामन्यात कधीच गोलंदाजी केलेली नाही आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

‘हा’ भारतीय खेळाडू सर्वाधिक दुर्लक्षित नायक, मोहम्मद कैफने मांडले परखड मत

स्टेडियम मध्ये जाऊन दुसरा कसोटी सामना पहायचा आहे? मग ‘या’ नियमांचे करावे लागणार पालन

“भारतीय संघ पाचव्या दिवशी विजयाचाच प्रयत्न करेल”, इशांत शर्माने स्पष्ट केले इरादे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---