इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल २०२२चा हंगाम सध्या शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. यंदाच्या हंगामात अनेक नवीन चेहऱ्यांनी आपली विशेष शैली दाखवली आहे. मात्र, त्याचबरोबर काही नामांकित खेळाडू आपली विशेष छाप सोडण्यात अपयशी ठरले असल्याचे दिसून येते. क्रिकेट विश्वात आपले नाव निर्माण करणाऱ्या काही खेळाडूंना विशेष कामगिरी करता न आल्यानं यंदाची आयपीएल त्यांच्यासाठी शेवटची आयपीएल ठरू शकणार असल्याच्या चर्चांना आता उधाण आलं आहे. यामध्ये प्रामुख्याने कायरन पोलार्ड, मनीष पांडे, अजिंक्य रहाणे, जयदेव उनाडकट आणि विजय शंकर या पाच खेळाडूंच्या नावाची चर्चा रंगत आहे.
कायरन पोलार्ड
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कायरन पोलार्ड (Kieron Pollard) याला यंदाच्या वर्षी नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही. पोलार्डला ११ सामन्यांमध्ये केवळ १३६ धावा करता आल्या. या धावा करत असताना पोलार्डचा स्ट्राईक रेट ११२.३९ असा निराशाजनक होता. आपल्या धडाकेबाज बॅटिंगसाठी प्रचलित असणाऱ्या पोलार्डचा स्ट्राईक रेट घसरल्याने मुंबईच्या संघाला मोठे नुकसान झाले असल्याचंही मत क्रिकेट जाणकरांकडून व्यक्त केले जात आहे.
मनीष पांडे
लखनऊ सुपर जाएंट्स (Manish Pandey) संघाकडून खेळणाऱ्या मनीष पांडेला यंदाच्या हंगामात ६ सामन्यात केवळ ८८ धावा बनवता आल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट सुद्धा केवळ ८० असा लाजीरवाणा असल्याचे आढळून आले. त्यामुळे पांडेला बऱ्याच सामन्यात संघातून वगळण्यात देखील आले आहे.
अजिंक्य रहाणे
कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाचा सलामीवीर म्हणून जबाबदारी मिळालेल्या मराठमोळ्या अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) देखील यंदाच्या हंगामात आपली चमक दाखवता आली नाही. रहाणेने ६ सामन्यात १००.९६ च्या स्ट्राईक रेटने केवळ १०५ रन्स बनवले. त्यामुळे आता रहाणेच्या फलंदाजीबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत.
जयदेव उनाडकट
यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघातील प्रमुख कारण म्हणजे मुंबईने बोली लावलेल्या जोफ्रा आर्चर यंदाच्या हंगामात उपलब्ध नसणे. आर्चरची कमी डावखुरा फास्ट बॉलर जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) भरून काढेल अशी आशा सर्वांनाच लागली होती. मात्र, जयदेवने या आशेवर पाणी फेरले आहे. त्यामुळे पुढील हंगामात जयदेवला आणखी एक संधी मिळेल का यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
विजय शंकर
सध्याच्या हंगामात नव्याने तयार झालेल्या गुजरात टायटन्सच्या (Gujarat Titans) संघाने विशेष कामगिरी केली आहे. सध्या गुजरात हा आयपीएलच्या प्लेऑफसाठी क्वालिफाय करणारा पहिला संघ ठरला असला, तरी संघात अष्टपैलू म्हणून निवडल्या गेलेल्या विजय शंकर (Vijay Shankar) याला विशेष चमक दाखवता आली नाही. विजयला ४ सामन्यात फलंदाजी करत असताना फक्त १९ धावा काढण्यात यश आले. शिवाय गोलंदाजीमध्येही विजयला काही विशेष कामगिरी करता आली नाही. त्यामुळे गुजरातच्या संघाची चांगलीच निराशा झाली असल्याचे पाहायला मिळत आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
युझवेंद्र चहललाही पुरून उरला हसरंगा; आरसीबीच्या गोलंदाजी प्रशिक्षकांनी केले तोंडभरून कौतुक
बसमध्ये पाँटिंगची एंट्री होताच, दिल्लीच्या खेळाडूंनी गायले ‘सैयाँ’, पाहा Funny Video
Video: विजयाचा जल्लोष! वॉर्नरने ‘हाऊज द जोश’ म्हणताच, सहकाऱ्यांनीही मिसळला सुरात सूर