परवा परवा न्यूझीलंडचा अल्टिमेट क्रिकेट लिजंड रॉस टेलर रिटायर झाला. रॉस टेलरच न्यूझीलंड क्रिकेटमधील योगदान काय? असा प्रश्न कोणाला केला तर त्यावर क्रिकेट चाहते एखादं पुस्तक लिहितील, पण त्या टेलरन रिटायर होण्याआधी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एक अशी कामगिरी करून ठेवली, जी यापूर्वी कोणी करण्याचा विचारही नसेल केला. क्रिकेटचे तिन्ही फॉर्मेट टेस्ट, वनडे अन् टी२०. या तिन्ही फॉरमॅटच्या शंभर शंभर इंटरनॅशनल मॅच खेळणारा टेलर एकमेव पठ्ठ्या.
टेलरच्या नशिबी हा रेकॉर्ड करण्याच भाग्य आलं, पण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये असेही काही दिग्गज राहिले, ज्यांनी १०० टेस्ट खेळल्या, टेस्ट क्रिकेटमध्ये लिजंड बनले, पण त्यांच्या नशिबात १०० वनडे आल्या नाहीत. आज त्याच धुरंधरांविषयी आपण जाणून घेणार आहोत, ज्यांना १०० वनडेची मॅजिकल फिगर गाठता आली नाही.
क्लाईव्ह लॉईड
वनडे क्रिकेट सुरू झालं, तेव्हा क्रिकेटच्या या नव्या फॉर्मेटवर एकाच टीमच अधिराज्य होतं, ती टीम म्हणजे वेस्ट इंडीज. पहिले दोन्ही वनडे वर्ल्ड कप याच टीमने जिंकले, आणि या दोन वेळा वर्ल्ड चॅम्पियन टीमचे कॅप्टन होते सर क्लाईव्ह लॉईड. सर क्लाईव्ह लॉईड कॅप्टन म्हणून दोन वनडे वर्ल्डकप जिंकले असले तरी, १०० वनडे त्यांच्या नशिबात नव्हत्या. ११० टेस्ट खेळणाऱ्या लॉईड यांनी ८७ वनडे खेळल्या. लॉईड रिटायर झाले, तेव्हा मुळातच वेस्ट इंडीज टीम अवघ्या १०१ वनडे खेळलेली. तरीही सलग तीन वनडे वर्ल्डकप फायनल कॅप्टन म्हणून खेळणाऱ्या लॉईड यांच्या करिअरमध्ये, १०० वनडेचा शगुन नाही झाला हे दुर्दैवच.
हेही पाहा- कसोटी क्रिकेट गाजवलं पण वनडेत पदरी पडली निराशा
ऍलिस्टर कूक
आपल्या शानदार करियरसाठी ज्याला खरंच सर म्हणावं असा क्रिकेटर म्हणजे इंग्लंडचा माजी कर्णधार ऍलिस्टर कूक. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याच्या सम तोच. टी२० क्रिकेटचा जमाना सुरू झाला, तेव्हाच कूकच करिअर पण सुरू झालं. तरीही कूक १६१ टेस्ट खेळला. इंग्लंडचा ऑल टाईम ग्रेट बनला, पण वनडे क्रिकेटमध्ये त्याचं नाणं वाजलंच नाही. चांगलं ऍव्हरेज आणि स्ट्राइक रेट राखूनही त्याच वनडे करिअर फक्त ९२ मॅच पुरतच मर्यादित राहील.
व्हीव्हीएस लक्ष्मण
सर क्लाईव्ह लॉईड अन् सर ऍलिस्टर कुक यांच्यानंतर त्यांच्याच तोडीचा तिसरा दिग्गज ज्याच्या नशिबात १०० वनडे नव्हत्या. तो म्हणजे भारताचा व्हीव्हीएस लक्ष्मण. टेस्ट क्रिकेटमध्ये लक्ष्मणने किती व्हेरी व्हेरी स्पेशल इनिंग खेळल्या हे आपण सारेजण जाणतो, पण दीड दशकाच्या आपल्या ग्रँड करिअरमध्ये १३४ टेस्ट खेळणाऱ्या लक्ष्मणच्या पदरी जेमतेम ८६ वनडे आल्या. विदेशी टूरवर नेहमीच इंडियन बॅटिंगचा बॅकबोन राहिलेल्या लक्ष्मणला कधीच टीम मॅनेजमेंटचा विश्वास संपादन करता आला नाही. लक्ष्मणनेही करिअरमध्ये एकही वर्ल्डकप खेळता न आल्याची खंत बोलून दाखवली होती.
जस्टिन लँगर
या यादीतील चौथे नाव ऐकून कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही. ते नाव आहे ऑस्ट्रेलियन जस्टिन लॅंगरच. आता आपल्या कोचींगसाठी रिस्पेक्ट मिळत असलेला लॅंगर क्रिकेटर पण दर्जा होता. ऑस्ट्रेलियासाठी तब्बल १०५ टेस्ट त्यान खेळल्या, पण वनडे खेळला आठ. होय फक्त आठ. विशेष म्हणजे त्याचं करिअर ज्या काळात घडलं. त्या काळात ऑस्ट्रेलियन टीमन सलग चार वर्ल्ड कप फायनल खेळल्या अन् तीन जिंकल्या. तरीही लॅंगरच ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील योगदान एका टक्क्यानेहि कमी झालं नाही.
ग्रॅहम थॉर्प
या यादीतील अखेरचं नाव म्हणजे इंग्लंडचा २१ व्या शतकातील पहिला मॉडर्न ग्रेट ग्रॅहम थॉर्पच. जवळपास १२ वर्षाचं इंटरनॅशनल करियर राहिलेल्या थॉर्पला इंग्लंडच्या त्या निवडक दिग्गजांत स्थान मिळाले, ज्यांनी क्रिकेटच्या या जन्मदात्या देशासाठी १०० टेस्ट खेळल्या. बरोबर १०० टेस्ट खेळणाऱ्या थॉर्पच्या नशिबात मात्र केवळ ८२ वनडे होत्या. इंग्लंड क्रिकेटने वनडे आणि टेस्ट क्रिकेटसाठी अलग-अलग टीमचा फॉर्मुला काढल्याचा परिणाम कदाचित थॉर्पच्या वनडे करियरवर झाला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘त्या’ दिवशी सामान्य दिसणारा जोगिंदर शर्मा भारतीय संघाचा हिरो बनलेला, जाणून घ्या एका क्लिकवर
चर्चाच एवढी रंगलीय की, उमरान ‘रॉकेट’ मलिकच्या स्पीडनं लोकं वेडी व्हायची राहिलीत
सलाम तुझ्या समर्पणाला! रक्तबंबाळ पाय घेऊन वॉटसन मुंबईला एकटा भिडलेला
मुंबई इंडियन्सला IPL 2022मध्ये मिळालाय ‘हिरा’, तो ‘बेबी एबी’ नाव सार्थ करणारंच!