---Advertisement---

कानपूर कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी षटकारांचा जोरदार पाऊस, टीम इंडियाने केला विश्वविक्रम

---Advertisement---

कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर भारत आणि बांग्लादेश यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याचे दोन दिवस पावसामुळे रद्द करणयात आले. पहिल्या दिवशी केवळ 35 षटकांचा खेळ झाला. अशा स्थितीत या सामन्याचा निकाल लागण्याची शक्यता कमी असल्याचे मानले जात होते. परंतु चौथ्या दिवशी बरेच काही घडले आणि भारतीय संघाने दमदार गोलंदाजीनंतर शानदार फलंदाजी केली आणि आता असे दिसते आहे की, या सामन्याचा पाचव्या दिवशी निकाल मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारतीय संघाने चौथ्या दिवशी षटकार ठोकून मोठा विश्वविक्रम केला.

टीम इंडिया एका कॅलेंडर वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा संघ बनला आहे. सोमवारी (30 सप्टेंबर) रोजी भारतीय फलंदाजांनी टी20 क्रिकेटप्रमाणे कसोटी क्रिकेट खेळले. एका डावात एकूण 11 षटकार मारले आणि अशा प्रकारे इंग्लंडचा विश्वविक्रम मोडला. इंग्लंड संघाने 2022 मध्ये 15 कसोटी सामन्यांमध्ये 89 षटकार ठोकले होते, तर टीम इंडियाने 8 कसोटी सामन्यांमध्ये 96 षटकार मारून इंग्लंडला मागे टाकले आहे. भारताला यावर्षी अजून 7 कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यामुळे भारत 150 षटकारांचा टप्पा सहज पार करेल अशी अपेक्षा आहे.

 

कसोटी क्रिकेटमध्ये एक संघ म्हणून सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम आता भारताच्या नावावर आहे. भारताने 96 तर इंग्लंडने 89 षटकार मारले आहेत. या यादीत तिसरे नाव देखील भारताचे आहे. संघाने 2021 मध्ये 14 कसोटी सामन्यांमध्ये 87 षटकार ठोकले होते. न्यूझीलंडने 2014 मध्ये एका वर्षात 81 षटकार मारले होते. त्याचवेळी 2013 मध्ये पण किवी संघाने 71 षटकार ठोकले होते. कानपूर कसोटी सामन्याबद्दल बोलायचे झाले तर भारताने पहिल्या डावात बांग्लादेशला 233 धावांत आटोपले. यानंतर भारतीय संघ फलंदाजी करताना 34.4 षटकांत 285/9 धावांवर डाव घोषित केला. या दरम्यान टीम इंडियाला 52 धावांची आघाडी मिळाली. यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या बांग्लादेशची सुरुवात खराब झाली. केवळ 26 धावांवर दोन फलंदाज तंबूत परतले आहेत.

हेही वाचा-

विराट कोहली 15 हजार ते 27000 पर्यंत नंबर वन; आणखी एक विश्वविक्रम नोंदवला
कसोटीमध्ये पहिल्या 2 चेंडूवर षटकार ठोकणारे फलंदाज
बुमराह आयपीएल लिलावात उतरला तर ‘इतक्या’ कोटींची लागेल बोली, हरभजनने वर्तवला अंदाज

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---