Five Neglected Cricketers: भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिली कसोटी 25 जानेवारीपासून खेळवली जाणार आहे. खरं तर भारत-इंग्लंड मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या कसोटी मालिकेसाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्मा संघाचा कर्णधार असेल. परंतु, आज आपण अशा खेळाडूंबद्दल पाहणार आहोत ज्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे, परंतु भारत-इंग्लंड कसोटी मालिकेसाठी त्यांची निवड झाली नाही. (5 players whom the selectors ignored for england test ind vs eng here know details)
सौरभ कुमार
सौरभ कुमार (Saurabh Kumar) देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली गोलंदाजी करत आहे. सौरभ कुमारने उत्तर प्रदेशसाठी 65 प्रथम श्रेणी सामन्यात 280 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय तो भारत ए संघाचा भाग होता, पण आता त्याला भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळालेली नाही.
वॉशिंग्टन सुंदर
वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) भारतीय संघामध्ये सारखा आत बाहेर करत असतो. मात्र, वॉशिंग्टन सुंदरने भारतीय संघासाठी 4 कसोटी खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने तीन अर्धशतके केली आहेत. एक फलंदाज म्हणून, या खेळाडूने कसोटी फॉर्मेटमध्ये 66 च्या सरासरीने धावा केल्या आहेत, परंतु इंग्लंड मालिकेसाठी त्याची निवड झाली नाही.
अभिमन्यू ईश्वरन
बंगालकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या अभिमन्यू ईश्वरन (Abhimanyu Easwaran) याचा अनेकवेळा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे, मात्र आता त्याला भारताकडून खेळण्याची संधी मिळालेली नाही. अभिमन्यू ईश्वरनने 89 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 47 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
सरफराज खान
या यादीत सरफराज खान (Sarfaraz Khan) याच्या नावाचाही समावेश आहे. सरफराज खान देशांतर्गत क्रिकेटमध्ये सतत धावा करत आहे, मात्र आजपर्यंत तो भारतीय संघाचा भाग बनू शकलेला नाही. वास्तविक, श्रेयस अय्यर मधल्या फळीत सतत संघर्ष करत आहे, अशा परिस्थितीतही सरफराज खानला संघात संधी देण्यात येत नाही.
रजत पाटीदार
रजत पाटीदार ( Rajat Patidar) याचा देशांतर्गत रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. रजत पाटीदारने 54 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 45 च्या सरासरीने 3845 धावा केल्या आहेत. या खेळाडूच्या नावावर 11 प्रथम श्रेणी शतके आहेत. मात्र भारत-इंग्लंड मालिकेसाठी रजत पाटीदारची निवड झालेली नाही. (These 5 players have consistently performed well in domestic cricket but the selectors still ignored them)
हेही वाचा
अफगाणिस्तानच्या खेळाडूने रिंकूसोबत विमानात असं काही केलं, ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार करू शकत नाही, पाहा व्हिडिओ
‘मी वाट पाहू शकत नाही’, स्टीव्ह स्मिथची संघातील नव्या भूमिकेवर मोठी प्रतिक्रिया