---Advertisement---

अफगाणिस्तानच्या खेळाडूने रिंकूसोबत विमानात असं काही केलं, ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार करू शकत नाही, पाहा व्हिडिओ

Rinku-Singh-Viral-Video
---Advertisement---

Rinku Singh India vs Afghanistan: भारत विरुद्ध अफगानिस्तान दरम्यान तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात 6 विकेटने जबरदस्त विजय मिळवला. यानंतर होणारा दुसरा सामना इंदोरला खेळवला जाणार आहे. पहील्या सामन्यानंतर खेळाडूंचा एक मजेशीर व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर करण्यात आला. या व्हिडिओमध्ये भारताचा य़ुवा फलंदाज रिंकु सिंग सोबत अफगानिस्तानचा रेहमानउल्ला गुरबाजने प्रॅंक केला आहे.

रिंकू सिंग(Rinku Singh) सोबत प्रॅंक केल्याचा व्हिडिओ केकेआरने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. यामध्ये विमानात भारत आणि अफगानिस्तानचे खेळाडू दिसत आहेत. रिंकु सिंग आपल्याजागेवर गाढ झोपेत होता. अशात अफगानिस्तानचा यशष्टीरक्षक फलंदाज रेहमानउल्लाह गुरबाज(Rahmanullah Gurbaz) ने त्याच्या नाकापाशी बोट नेत त्याची झोपमोड केली. सुरवातीला झोपेत असल्याने रिंकुला काय चाललय याची कल्पनाच आली नाही. परंतु काही क्षणात स्वतःला सावरत रिंकुने स्मितहास्य केल. यानंतर गुरबाजने रिंकुच्या डोक्यावरुन प्रेमाने हात फिरवला. हे दोन्ही खेळाडू आयपीयल मध्ये केकेआरमध्ये खेळतात. यामुळेच त्यांच्यात ही जबरदस्त मैत्री पहायला मिळाली. मैदानातही त्यांची ही बॉंडींग पहायला मिळाली आहे. दोघांनाही केकेआरने 2024च्या लिलावात रिटेन केले आहे.(ind-vs-afg-rahmanullah-gurbaz-prank-with-rinku-singh-in-flight-kkr-shared-video)

 

View this post on Instagram

 

A post shared by Kolkata Knight Riders (@kkriders)

रिंकु सिंग भारताचा नवा फिनिशर
रिंकु सिंगला भारतीय संघात विशेषकरुन टी20 संघात सध्या धोनीचा पर्याय म्हणून पाहिले जात आहे. आत्तापर्यंत खेळल्या गेलेल्या सर्व सामन्यात आपल्या संघाला त्याने जबरदस्त फिनिशिंग करुन दिली. आजवर रिंकुने भारतासाठी 13 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळलेत. यामध्ये 180 च्या स्ट्राइकरेटने त्याने 278 धावा केल्या आहेत. भारतीय संघासाठी जरी रिंकुची ही सुरुवात असली तरी रिंकुच्या आयपीएलमधील जबरदस्त कामगिरीमुळे त्याच्याकडून सर्वांनाच खूप जास्त अपेक्षा आहेत. आयपीएल 2023 च्या हंगामात त्याने लखनऊविरुद्धच्या एका सामन्यात शेवटच्या शटकात पाच षटकार ठोकून संघाला विजय मिळवून दिला होता. तेव्हापासूनच सर्वत्र रिंकुच्या नावाची चर्चा आहे. (The Afghanistan player did something with Rinku on the plane that you can’t even imagine)

महत्वाच्या बातम्या

द्रविडला टाळणं इशानला पडलं महागात; प्रशिक्षकाने दाखवला थेट बाहेरचा रस्ता, वाचाच
विराट-रोहितला बाबरपासून मोठा धोका, टी-20 मधील मोठा विक्रम मोडण्याच्या तयारीत

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---