---Advertisement---

५ अतिशय विचित्र गोलंदाजी शैली, ज्या पाहुन प्रेक्षकांना यायचे जोरदार हसू

On: मंगळवार, मे 5, 2020 10:07 AM
---Advertisement---

क्रिकेटमध्ये अनेक गोलंदाज असे आहेत, ज्यांनी त्यांची ओळख त्यांच्या चेंडू टाकण्याच्या शैलीवरुन निर्माण केली. एखाद्या गोलंदाजाला त्याची शैली तयार करण्यासाठी सातत्याने मेहनत घ्यावी लागते. त्याचबरोबर एक वेगळी शैलीने गोलंदाजी करताना कामगिरीतही सातत्य राखावे लागते. यामध्येही काही गोलंदाज यशस्वी झाले आहेत. तर काहींना अपयश आले आहे.

अशा काही वेगळी गोलंदाजी शैली असणाऱ्या ५ खेळाडूंचा घेतलेला हा आढावा –

केदार जाधव –

भारताच्या मर्यादीत षटकांच्या संघातील अष्टपैलूू क्रिकेटपटू केदार जाधवने अनेकदा फलंदाजीबरोबरच गोलंदाजीतही त्याचे योगदान दिले आहे. पण त्याच्या गोलंदाजी शैलीबद्दल बरीच चर्चा झाली आहे. अनेकदा त्याला चाहते ट्रोलही करतात. केदारने आत्तापर्यंत २७ विकेट्सही घेतल्या आहेत. यातील बऱ्याचशा विकेट त्याला लो आर्म ऑफ-स्पिन गोलंदाजी करताना मिळाल्या आहेत.

केदारने त्याच्या गोलंदाजी शैलीचे श्रेय एमएस धोनी आणि अनिल कुंबळेला दिले आहे. त्याने म्हटले आहे की धोनीने दाखवलेल्या विश्वासामुळे आणि कुंबळेने दिलेल्या सल्ल्यामुळे त्याच्या गोलंदाजीत सुधारणा झाली.

https://twitter.com/JadhavKedar/status/959280908820914177

लसिथ मलिंगा – 

श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगाचीही गोलंदाजी शैली विचित्र आहे. पण तरीही तो सध्या एक यशस्वी गोलंदाज आहे. तो गोलंदाजी करत असताना वेगळ्या शैलीने चेंडू ज्या कोनातून (Angle) सोडतो ते पाहून फलंदाज गोंधळात पडतो. त्यात त्याचा चेंडू वेगाने जात असल्याने आणि बऱ्याचदा चेंडू यॉर्कर्स असल्याने फलंदाजाला विचार करण्यासाठी वेळही मिळत नाही.

मलिंगाने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३४० सामन्यात ५४६ विकेट्स घेतल्या आहेत.

Photo Courtesy: Twitter/ ICC

पॉल ऍडम्स – 

दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज पॉल ऍडम्स हा नेहमीच क्रिकेट चाहत्यांच्या त्याच्या विचित्र गोलंदाजी शैलीमुळे लक्षात राहिला. तो गोलंदाजी करताना रनअप घेतल्यानंतर एक उडी मारायचा आणि वेगळ्याच पद्धतीने हात फिरवून चेंडू टाकायचा. तसेच चेंडू टाकताना त्याचे शरीर पूर्ण वाकायचे. त्यामुळे फलंदाजाला त्याचा चेंडू कुठुन येत आहे, हे समजायचे नाही. त्याने दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६९ सामन्यात १६३ विकेट्स घेतल्या आहेत.

Photo Courtesy: Twitter/ ICC

देबाशिष मोहंती –

भारताचा माजी गोलंदाज देबाशिष मोहंती हा अनेक क्रिकेट चाहत्यांना त्याच्या गोलंदाजी शैलीमुळे लक्षात आहे. मोहंती रन अप संपत आल्यावर हवेत उडी मारून दोन्ही हात विचित्र रीतीने फिरवायचा. तसेच त्याचे डोळे चेंडू सोडताना मोठे व्हायचे. त्याची चेंडू टाकतानाची स्थिती पाहून आयसीसीने  १९९९ च्या विश्वचषकाचा लोगो त्याच्या गोलंदाजीच्या शैलीवरून बनवला होता. त्या विश्वचषकात त्याने १० विकेट्स देखील घेतल्या. मोहंती भारताकडून ४७ सामन्यांत खेळला त्यात त्याने ६१ विकेट्स घेतल्या.

केविन कोथथीगोडा – 

२०१८ मध्ये मलेशियात झालेल्या १९ वर्षांखालील आशिया चषकात श्रीलंकेच्या १८ वर्षीय केविन कोथथीगोडाने त्याच्या विचित्र गोलंदाजी शैलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तोही काहीसा पॉल ऍडम्स सारखा गोलंदाजी करतो. त्याचेही शरिर चेंडू सोडताना वाकते. त्यामुळे त्याची अनेकदा ऍडम्सशी तुलना होते.

तो एकदा त्याच्या गोलंदाजी शैलीबद्दल म्हणाला होता की ‘मी कधीच पॉल ऍडम्सला गोलंदाजी करताना पाहिले नाही,  जेव्हा माझी तुलना ऍडम्स बरोबर करण्यात आली तेव्हा माझी नजर त्याच्या गोलंदाजीच्या शैलीवर गेली. मी सुरुवातीपासूनच अशी गोलंदाजी करीत आहे. श्रीलंकेत १३, १४ १७ आणि १९ वर्षांखालील क्रिकेट खेळत असतानाही मी माझ्या गोलंदाजीच्या शैलीमध्ये बदल केला नाही.’

https://twitter.com/PaulRadley/status/1195686853405552640

शिविल कौशिक –

२०१६ च्या आयपीएल मोसमादरम्यान जेव्हा चायनामन गोलंदाज शिविल कौशिकने गुजरात लायन्सकडून पदार्पण केले होते त्यावेळी त्याने त्याच्या गोलंदाजी शैलीने सर्वांचे लक्ष वेधले होते. तो नेहमीच्या चायनामन गोलंदाजांप्रमाणे नसुन त्याची गोलंदाजी शैली काहीशी ऍडम्सप्रमाणे आहे. फक्त तो चेंडू सोडताना उडी घेत नाही. कर्नाटककडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या शिविलने आयपीएलमध्ये १० सामने खेळले असून ६ विकेट्स घेतल्या आहेत.

https://twitter.com/StarSportsIndia/status/728524120921530368

ट्रेंडिंग लेख –

क्रिकेट इतिहासात सर्वात वेगवान चेंडू टाकणारे ३ गोलंदाज

एकाच संघात एकाचवेळी खेळलेले टाॅप ५ स्पर्धक खेळाडू, जे आहेत चांगले मित्र

पदार्पणाच्या कसोटी मालिकेतच मॅन ऑफ द सिरीज ठरलेले ३ भारतीय खेळाडू, एक आहे २० वर्षांच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---