ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानात पराभव केल्यानंतर भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध चांगली कामगिरी करेल अशी भारतीय चाहत्यांची अपेक्षा होती, परंतु ती फोल ठरली. चेन्नईच्या मैदानात इंग्लंडने भारताचा २२७ धावांनी पराभव करत चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. अखेरच्या दिवशी सुद्धा भारतीय संघाने ४२० धावांचा पाठलाग करत असताना खराब कामगिरी करत केवळ सर्वबाद १९२ इतक्याच धावा काढल्यामुळे पहिल्या सामन्यातच भारताचा पराभव झाला.
अखेर भारतासारख्या बलाढ्य संघासमोर इंग्लड कसे जिंकला? रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि जसप्रीत बुमराहसारखे खेळाडू भारतीय संघात असून सुद्धा पहिल्या सामन्यात ते हरले याची नक्की काय कारण होते? याचा आपण आढावा घेऊ.
५. चुकीची संघनिवड –
चेन्नईत पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात काही खेळाडूंना डावलण्यात आले होते. कुलदीप यादव याला संघात स्थान न देता ती संधी शहबाज नदीम याला दिली गेली. वॉशिंग्टन सुंदरला अष्टपैलू म्हणून संधी देऊन देखील तो गोलंदाजीमध्ये संधीचे सोने करण्यास अपयशी ठरला. अनेकांनी कुलदीपला ११ जणांच्या संघात न निवडणे हेच भारताचे सर्वात मोठे पराभवाचे कारण असल्याचे म्हटले आहे.
महा स्पोर्ट्सचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
४. गोलंदाजांमार्फत कोणतीच योजना अंमलात आणली गेली नाही
चेन्नईची खेळपट्टीवर ही फिरकी गोलंदाजी करण्यासाठी अनुकूल असताना देखील भारतात पहिल्यांदा खेळणाऱ्या डोम बेसला कोणताच गोलंदाज अडवू शकला नाही. तसेच जो रुटने खोऱ्याने धावा घेतल्या. जरी खेळपट्टी पहिल्या ३ दिवस फलंदाजांना मदत करत असली तरी भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात फार खराब कामगिरी केली हे सत्य देखील बदलता येणार नाही. दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाज ते थोडेफार यशस्वी ठरले परंतु त्याला फार उशीर झाला होता. त्यातही इंग्लंडच्या खेळाडूंनी छोटेखानी खेळींसह त्यांची आघाडी ४०० धावांच्या वर नेण्यात यश मिळवले.
३. रोहित-रहाणे फलंदाजीत फ्लॉप
रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे हे या सामन्यात आपल्या फलंदाजीची योग्य चुणूक दाखविण्यात अयशस्वी ठरले आणि हे भारतीय संघ हरण्याचे मुख्य कारणांपैकी एक कारण होते. रोहितने पहिल्या डावात ६ तर दुसऱ्या डावात फक्त १२ धावा काढल्या, याव्यतिरिक्त रहाणे याने आपल्या पहिल्या डावात १ धाव काढली, तर दुसऱ्या डावात तो शुन्यावरच बाद झाला.
२. नाणेफेक हरणे
चेन्नईची खेळपट्टी ही पहिल्या दोन-तीन दिवसांसाठी फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंसाठी स्वर्गासारखी होती. त्यामुळे हेच कारण आहे की इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या निर्णयला त्याने स्वत: द्विशतकी खेळी करत योग्य सिद्ध केले. त्यानंतर भारतीय संघाने पहिल्या डावात ३३७ धावा काढत आपले सर्व गडी गमावलले. त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या दिवशी मात्र, गोलंदाजांचे वर्चस्व या सामन्यात पाहयला मिळाले.
१. ‘जो रूट’ हाच ठरला भारताच्या पराभवाचे मुख्य कारण
जो रूटने आपल्या शानदार द्विशतकी खेळीने इंग्लंडला विजायकडे खेचले. समोर जसप्रीत बुमराह, आर अश्विन किंवा कोणताही गोलंदाज असो त्याने आपली ही उत्कृष्ठ लय कायम राखली आणि २१८ धावांची ताबडतोड खेळी केली. जो रूटच्या या द्विशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात तब्बल ५७८ धावा केल्या. त्यानंतर भारताला ३३७ धावांत पहिल्या डावात सर्वबाद करत २४१ धावांची आघाडी घेतली. ज्याचा फायदा इंग्लंड संघाला झाला. त्याचमुळे सामन्याचा सामनावीर पुरस्कारही त्याला जाहीर झाला.
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंडविरुद्ध दारुण पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया, म्हणतोय...
याद है, मैंने पेहले ही चेतावणी दी थी..! चेन्नई कसोटीतील भारताच्या दारुण पराभवानंतर पीटरसनचा टोमणा
सहा पैकी सहा! कर्णधार रुटचा आशिया खंडातही डंका, केला ‘हा’ मोठा रेकॉर्ड
५० वर्षांपुर्वी जर पैशांचा पाऊस पडला नसता, तर कदाचित ‘वनडे क्रिकेट’चे नावदेखील नसते