---Advertisement---

इंग्लंडविरुद्ध दारुण पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया, म्हणतोय…

On: मंगळवार, फेब्रुवारी 9, 2021 4:55 PM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड संघादरम्यान पाहिला कसोटी सामना चेन्नई येथे नुकताच पार पडला. या सामन्यात इंग्लंडने सांघिक कामगिरीच्या बळावर भारताचा २२७ धावांनी पराभव केला. विशेष म्हणजे २०१७ नंतर भारताला पहिल्यांदाच मायभूमीत कसोटी सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. भारताच्या या पराभवाबद्दल अनेक क्रिकेट रसिकांकडून नाराजीचा सूर उमटत आहे. या दरम्यानच सामना संपल्यानंतर कर्णधार विराट कोहलीची प्रतिक्रिया समोर येत असून, त्याने काही महत्वाचे मुद्दे मांडले आहेत.

विराट म्हणाला,”खेळपट्टी फार संथ होती. सुरुवातीच्या दोन दिवसात काही विशेष झाले नाही. या दोन दिवसात खेळपट्टी पूर्णतः फलंदाजीसाठी अनुकूल होती. इंग्लंडने अवघड परिस्थितीमध्ये मनोबल उंचावले व त्यांनी उत्तम कामगिरी केली.आम्ही दुसऱ्या इनिंगमध्ये चुका सुधारण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत फार उशीर झाला होता.”

विराट पुढे म्हणाला,” कसोटी क्रिकेट हा एक कठीण प्रकार आहे आणि इंग्लंड संघ आमच्यापेक्षा चांगल्या तयारीत होता. संपूर्ण कसोटी सामन्यात इंग्लंडने आमच्यापेक्षा उत्कृष्ट कामगिरी केली. यात काही शंका नाही की आम्ही विरोधी संघावर दबाव आणू शकलो नाही. या पराभवाबद्दल आम्ही काहीही कारण सांगणार नाही. मात्र पुढील तीन कसोटी सामन्यात नक्कीच उत्तम कामगिरी करू.”

इंग्लंडने संपूर्ण सामन्यात शानदार कामगिरी केली. विशेष म्हणजे इंग्लंडने सांघिक कामगिरीच्या बाळावर भारताचा पराभव केला. विशेषतः भारतीय फलंदाजांविरुद्ध इंग्लंडच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. भारताचा पहिला डाव ३३७ धावांवर संपुष्टात आला होता. भारताकडून रिषभ पंतने ९१, चेतेश्वर पुजाराने ७३ आणि वॉशिंग्टन सुंदरने नाबाद ८५ धावांची अर्धशतकी खेळी केली होती. इंग्लंडने जो रुटच्या २१८ धावांच्या द्विशतकी आणि डॉम सिब्ली(८७) व बेन स्टोक्सच्या(८२) अर्धशतकाच्या जोरावर पहिल्या डावात ५७८ धावा उभारल्याने त्यांनी पहिल्या डावात २४१ धावांची आघाडी घेतली होती.

यानंतर इंग्लंडने फॉलोऑन न देता दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी दुसऱ्या डावात सर्वबाद १७८ धावा केल्या आणि पहिल्या डावातील २४१ धावांच्या आघाडीसह भारताला ४२० धावांचे आव्हान दिले होते. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात भारताकडून आर अश्विनने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या होत्या.

महा स्पोर्ट्सचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

त्यानंतर ४२० धावांचा पाठलाग करताना भारताकडून कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक ७२ धावा केल्या. त्याच्यापाठोपाठ शुबमन गिलने ५० धावांची खेळी केली. अन्य कोणत्याही फलंदाजाला २० धावांचा टप्पाही पार करता आला नाही. इंग्लंडकडून या डावात जॅक लीचने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर जेम्स अँडरसनने ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय डॉमनिक बेस  बेन स्टोक्सने आणि जोफ्रा आर्चरने प्रत्येकी १ विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या –

याद है, मैंने पेहले ही चेतावणी दी थी..! चेन्नई कसोटीतील भारताच्या दारुण पराभवानंतर पीटरसनचा टोमणा

सहा पैकी सहा! कर्णधार रुटचा आशिया खंडातही डंका, केला ‘हा’ मोठा रेकॉर्ड

५० वर्षांपुर्वी जर पैशांचा पाऊस पडला नसता, तर कदाचित ‘वनडे क्रिकेट’चे नावदेखील नसते

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---