महिला आशिया चषकाच्या फायनलमध्ये श्रीलंकेनं भारतीय संघाचा दारुण पराभव केला. श्रीलंकेच्या संघानं 166 धावांचं लक्ष्य 18.4 षटकात फक्त 2 गडी गमावून गाठलं आणि प्रथमच आशिया चषक ट्रॉफी आपल्या नावे केली. या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना का करावा लागला, त्यामागची 5 कारणे या बातमीद्वारे जाणून घ्या
(1) खराब सुरुवात – आशिया कप फायनलमध्ये टीम इंडियाचं हरण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे संघाला वेगवान सुरुवात मिळाली नाही. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शेफाली वर्मा 19 चेंडूत 16 धावा करून बाद झाली. भारतानं पहिल्या 5 षटकात फक्त 30 धावा केल्या.
(2) उमाला वरच्या क्रमांकावर पाठवणं – महिला आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तुम्ही अशा संघाविरुद्ध खेळत होता, ज्यांला तिथल्या परिस्थितीची चांगली जाणीव आहे. परंतु तुम्ही अशा फलंदाजाला वरच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवलं, जिला फलंदाजीचा थोडासाही अनुभव नव्हता. भारतीय संघानं उमा छेत्रीला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवलं. मात्र ती 7 चेंडूत केवळ 9 धावा करू शकली.
(3) कर्णधाराची चूक – या सामन्यात भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरनं केलेली सर्वात मोठी चूक म्हणजे ती अधिक फलंदाजांसह गेली, पण तिनं स्वत: किंवा सलामीवीरांनी आक्रमकता दाखवली नाही. भारताकडे फक्त पाच गोलंदाजीचे पर्याय होते. मात्र हरमननं योग्य वेळी योग्य गोलंदाजांचा वापर केला नाही. याशिवाय तिनं एक झेलही सोडला.
(4) चमारी अटापट्टूची फलंदाजी – श्रीलंकेच्या महिला संघाची कर्णधार चामारी अटापट्टू ही वन मॅन आर्मीसारखी आहे. तिची बॅट चालली तर सामना श्रीलंकेच्या बाजूनं जाईल, हे सर्वांनाच माहीत होतं. झालंही तसंच. तिच्या फलंदाजीचं भारतीय गोलंदाजांकडे काहीच उत्तर नव्हतं.
(5) हर्षिताची चमकदार कामगिरी – या सामन्यात श्रीलंकेची युवा फलंदाज हर्षिता समरविक्रमानं भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. तिनं ना फिरकीपटूंना सोडलं, ना वेगवान गोलंदाजांना. त्यामुळेच भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं. हर्षितानं 51 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 69 धावांची नाबाद खेळी केली.
हेही वाचा –
टीम इंडियाचा हार्टब्रेक! आशिया चषकाच्या फायनलमध्ये श्रीलंकेकडून पराभव
श्रीलंकेसाठी दोन्ही हातांनी गोलंदाजी करणारा कामिंदू मेंडिस पहिलाच गोलंदाज नव्हे; 28 वर्षांपूर्वीही झालंय असं
IND vs SL : ओल्या मैदानामुळे भारत विरुद्ध श्रीलंका संघातील दुसऱ्या टी20 सामन्याच्या नाणेफेकीला उशीर