---Advertisement---

पाकिस्तानविरुद्धची वनडे मालिका अर्ध्यात सोडून ‘या’ संघाचे शिलेदार निघाले आयपीएल वारीला

On: सोमवार, एप्रिल 5, 2021 7:25 PM
---Advertisement---

सध्या पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात पाकिस्तान संघाने विजय मिळवला होता. तर दुसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकन संघाने चोख प्रत्युत्तर देत १७ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासोबतच दक्षिण आफ्रिका संघाने मालिका १-१ ने बरोबरीत आणली आहे. दुसरा वनडे सामना झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकन संघातील खेळाडूंनी आयपीएल खेळण्यासाठी भारताकडे आपला मोर्चा वळवला आहे.

मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिका संघातील पाच प्रमुख खेळाडू संघात नसणार आहेत. क्विंटन डी कॉक, कागीसो रबाडा, एन्रिच नॉर्किए, लुंगी एन्गिडी आणि डेविड मिलर हे पाचही खेळाडू आयपीएल खेळण्यासाठी भारताच्या दिशेने रवाना झाले आहेत. पाकिस्तान संघाविरुद्ध वनडे मालिका झाल्यानंतर या दोन्ही संघांमध्ये ४ सामन्यांची टी -२० मालिका खेळवण्यात येणार आहे.

हे पाचही खेळाडू भारतात येणार असल्याची बातमी, त्यांच्या संघाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने आपल्या ट्विटर हॅन्डलवर रबाडा आणि नॉर्किए या दोघांचा विमानतळावरील फोटो शेअर करत लिहिले की, “रबाडा आणि नॉर्किए आयपीएल २०२१ साठी निघाले आहेत.”

तसेच डेविड मिलर याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो शेअर करत लिहिले की, “दक्षिण आफ्रिकन संघासोबत एप्रिल महिन्याची चांगली सुरुवात मिळाल्यानंतर मी आता भारताच्या दिशेने राजस्थान रॉयल्स संघाकडे जाण्यासाठी निघालो आहे.”

तसेच लुंगी एन्गिडी आणि क्विंटन डी कॉक हे देखील भारताच्या दिशेने रवाना झाले आहेत. याबाबतची माहिती त्यांच्या संघाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर देण्यात आली नाहीये.

महत्वाच्या बातम्या-

सलग ४ हंगामात प्लेऑफ गाठलेल्या आयपीएलच्या ‘या’ संघाला का म्हटले जाते कंजूस आणि लूटेर्‍यांची टीम? वाचा कारण

IPL 2021: ‘रनमशिन’ कोहलीची नजर खास विश्वविक्रमावर, आजपर्यंत कोणालाच नाही जमला नाहीये ‘तो’ पराक्रम

नवख्या शिलेदाराने मिळवलं कुंबळेंच्या मनात स्थान; म्हणाले, ‘तो मला पोलार्डची आठवण करुन देतो’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---