आगामी आयपीएल (Indian Premier League) हंगामाची चाहते आतुरताना वाट पाहत आहेत. 2025च्या आयपीएल हंगामापूर्वी मेगा लिलाव होणार आहे. मेगा लिलावापूर्वी भारतीय नियामक मंडळाने (BCCI) नवे रिटेंशन नियम जाहीर केले आहेत. नव्या नियमांनुसार सर्व संघ 6 खेळाडूंना कायम ठेवू शकतात परंतु जास्तीत जास्त 5 कॅप्ड, जास्तीत जास्त 2 अनकॅप्ड खेळाडू असू शकतात. तत्पूर्वी शेवटच्या हंगामात अनेक आफ्रिकन खेळाडूंनी चांगली कामगिरी केली, तर काही खेळाडू चमकदार कामगिरी करण्यात अपयशी ठरले. अशा परिस्थितीत, आपण दक्षिण आफ्रिकेच्या अशा 5 खेळाडूंबद्दल जाणून घेऊया ज्यांना आगामी मेगा लिलावापूर्वी सोडले जाऊ शकते.
एनरिक नॉर्खिया (दिल्ली कॅपिटल्स)- दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नाॅर्खियाला दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) मेगा लिलावापूर्वी कागिसो रबाडाला प्राधान्य देऊन कायम ठेवले होते. दिल्लीने नोर्खियाला 6.5 कोटी रुपयांना विकत घेतले होते, आयपीएल 2024 मध्ये, नॉर्खियाने 6 सामन्यांमध्ये 42च्या सरासरीने फक्त 7 विकेट्स घेतल्या. अशा स्थितीत संघात त्याची जागा बनने अवघड आहे.
एडन मारक्रम (सनरायझर्स हैदराबाद)- दक्षिण आफ्रिकेचा टी20 कर्णधार एडन मारक्रम (Aiden Markram) गेल्या काही वर्षांपासून हैदराबादकडून खेळत आहे. पण आयपीएल 2024 मधील त्याची कामगिरी संघासाठी काही खास राहिली नाही. मारक्रमने 11 सामन्यात केवळ 1 अर्धशतक झळकावले, तर 220 धावा केल्या. त्याचबरोबर विदेशी खेळाडूंच्या रूपाने हैदराबादकडे जबरदस्त पर्याय आहेत. या कारणास्तव फ्रेंचायझी त्याला सोडू शकते.
मार्को जॅन्सन (सनरायजर्स हैदराबाद)- दक्षिण आफ्रिकेचा स्टार अष्टपैलू मार्को जॅन्सनची 2024च्या आयपीएल मधील कामगिरी काही खास नव्हती. त्याची निराशाजनक कामगिरी लक्षात घेता हैदराबादचा संघ त्याला मेगा लिलावापूर्वी बाहेरचा रस्ता दाखवू शकतो. शेवटच्या हंगामात त्याने हैदराबादसाठी 3 सामन्यात केवळ 1 विकेट घेतली होती.
नांद्रे बर्गर (राजस्थान रॉयल्स)- दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा वेगवान गोलंदाज नांद्रे बर्गरने शेवटच्या हंगामात आयपीएलमध्ये पदार्पण केले. बर्गरला राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) लिलावात 50 लाख रुपयांना आपल्या ताफ्यात सामील केले होते. दरम्यान त्याने 6 सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 20.71च्या सरासरीने 7 विकेट्स घेतल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
श्रीलंकेच्या संगकाराने भारताच्या ‘या’ खेळाडूला म्हटले जगातील सर्वोत्तम टी20 फिनीशर!
कसोटीमधील रिषभ पंतचे हे 5 मोठे विक्रम मोडणे जवळपास अशक्य
आत्महत्या की दुसरं काही? माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यात संशयास्पद मृत्यू