मंगळवारी (२९ सप्टेंबर) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात आयपीएल २०२०चा ११वा सामना पार पडला. अबू धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर झालेला हा सामना दोन्ही संघांचा तिसरा सामना होता. या हंगामातील यापूर्वीच्या २ सामन्यात दिल्लीने विजय मिळवला होता, तर हैदराबाद संघाने त्यांचे दोन्ही सामने गमावले होते.
मात्र हैदराबादने दिल्लीविरुद्ध १५ धावांनी विजय मिळवत दमदार पुनरागमन केले. प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद संघाने २० षटकात ४ विकेट्स गमावत १६२ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्ली संघ २० षटकात ७ विकेट्स गमावत केवळ १४७ धावाच करु शकला. त्यामुळे हैदराबादने १५ धावांनी या हंगामातील पहिला सामना जिंकला. हैदराबादच्या या विजयात संघातील ५ खेळाडूंनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. चला तर बघूया, कोण आहेत ते पाच खेळाडू…?
राशिद खान
हैदराबाद संघाचा युवा फिरकीपटू राशिद खान याने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात आपली कमाल दाखवली. या फिरकी गोलंदाजाने ४ षटकात गोलंदाजी करताना केवळ १४ धावा दिल्या आणि सर्वाधिक ३ विकेट्स चटकावल्या. त्याने घेतलेल्या या तिन्ही विकेट्स अतिशय महत्त्वाच्या होत्या. कारण राशिदने घेतलेल्या तीन विकेट्समुळे दिल्ली संघाची वरची आणि मधळी फळी कमजोर झाली होती. त्याने शिखर धवन, श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांना बाद केले होते.
जॉनी बेयरस्टो
हैदराबाद संघाचा सलामीवीर फलंदाज जॉनी बेयरस्टो या सामन्यात सुरुवातीला संघर्ष करताना दिसला. पण पुढे लयीत आलेल्या बेयरस्टोने दमदार फटकेबाजी करायला सुरुवात केली. त्यामुळे त्याने ४८ चेंडूत २ चौकार आणि एका षटकाराच्या साहाय्याने ५३ धावा केल्या. दरम्यान त्याने पहिल्या विकेटसाठी डेविड वॉर्नरसोबत मिळून ७७ धावांची भागिदारी केली.
डेविड वॉर्नर
हैदराबाद संघाचा कर्णधार डेविड वॉर्नर याने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात १३६.३६च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. त्याने सलामीला फलंदाजीला येत ३३ चेंडूत ४५ धावा ठोकल्या. यात त्याच्या ३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.
केन विलियम्सन
दिल्लीविरुद्धचा सामना हा केन विलियम्सनचा आयपीएल २०२०मधील पहिलाच सामना होता. या धुरंदरने हैदराबाद संघाकडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत २६ चेंडूत ४१ धावांची तूफानी खेळी केली. यात त्याच्या ५ चौकारांचा समावेश होता. एवढेच नव्हे तर, विलियम्सनने बेयरस्टोसोबत मिळून तिसऱ्या विकेटसाठी ५२ धावांची भागिदारीही रचली.
भुवनेश्वर कुमार
हैदराबाद संघाचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात २ विकेट्स घेतल्या. ४ षटकात २५ धावा देत त्याने हा पराक्रम केला. दरम्यान त्याने दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ आणि शिमरॉन हेटमायर यांच्या विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
११ सामने झालेत पण सगळेच संघ एकतरी सामना जिंकले, फक्त एकच संघ आहे अपराजित
आयपीएलमध्ये चालतेय राशिद खानची जादू, केलाय ‘हा’ मोठा विक्रम
११ सामन्यानंतर आयपीएल२०२०चा असा आहे पॉईंट टेबल
ट्रेंडिंग लेख-
दिल्लीविरुद्धच्या विजयानंतर विलियम्सन, रशीद नाही तर ‘या’ भारतीयाचे डेविड वॉर्नरने केले कौतुक
कधी खेळली गेली होती पहिली सुपर ओव्हर? घ्या जाणून
चिन्नप्पापट्टी ते युएई असा प्रवास करणारा ‘टी नटराजन’