टी20 विश्वचषक 2024 स्पर्धा आता साखळी सामन्यांच्या अंतिम टप्यात आहे. पुढील दोन दिवसात आपल्याला सुपर-8 साठी पात्र ठरलेल्या संघाची नावे कळतील. पण सुपर-8 साठी पॉइंट टेबलवर नजर टाकली तर ही लढत खूपच रोमांचक होणार आहे. 5 संघ पुढील फेरीसाठी (सुपर-8) पात्र ठरले आहेत तर 8 संघ पूर्णपणे बाहेर पडले आहेत. तर या दरम्यान उर्वरित 3 जागांसाठी 7 संघांमध्ये लढत होणार आहे. यामध्ये पाकिस्तान आणि इंग्लंडसारख्या मोठ्या संघांंचा समावेश आहे.
सुपर-8 मध्ये पात्र ठरलेल्या संघांनमध्ये दोन गट तयार केले जातील, ज्यामध्ये प्रत्येक गटात 4-4 संघ असतील. आता उर्वरित 3 जागांसाठी 7 संघात लढत आहे. एकीकडे पाकिस्तान अमेरिकेच्या दुसऱ्या पराभवाची वाट पाहत आहे तर दुसरीकडे इंग्लंड 16 जून रोजी होणाऱ्या ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलंड यांच्यातील सामन्याची वाट पाहत आहे. अमेरिका साखळी फेरीतील शेवटचा सामना आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. जर अमेरिका जिंकली तर पाकिस्तानचा पत्त कट होईल. त्याचबरोबर इंग्लंड संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठ्या विजयाची आशा आहे, ज्यामुळे स्कॉटलंडचा धावगती खाली येईल.
तीन स्पॉट्ससाठी लढणाऱ्या 7 संघांमध्ये अमेरिका, पाकिस्तान, स्कॉटलंड, इंग्लंड, बांगलादेश, नेदरलँड आणि कॅनडा यांचा समावेश आहे. यातील बहुतांश संघांमध्ये रनरेटवर लढत आहे. पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यातील सर्वात रोमांचक युद्ध आहे. पाकिस्तानला हरवून अमेरिकेने मोठी खळबळ उडवून दिली होती, त्यानंतर परिस्थिती अशी आहे की पाकिस्तानला अमेरिकेच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागत आहे. टी 20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेतून बाहेर पडलेल्या संघांमध्ये न्यूझीलंड, श्रीलंका, आयर्लंड, नेपाळ, ओमान, नामिबिया आणि पापुआ न्यू गिनी, युगांडा यांचा समावेश आहे.
महत्तवाच्या बातम्या-
फ्लोरिडामध्ये पूरसदृश परिस्थिती, भारत-कॅनडा सामन्यावर पावसाचे सावट!
अफगाणिस्तानसह ‘हे’ संघ सुपर-8 साठी पात्र, न्यूझीलंड-श्रीलंका विश्वचषकातून आउट!
टी20 विश्वचषकातील खराब कामगिरीमुळे, विराटच्या नावी लज्जास्पद विक्रमाची नोंद!