भारतीय संघ आयपीएल २०२० चा हंगाम संपल्यानंतर लगेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. तिथे दोन्ही संघांदरम्यान प्रथम ३ सामन्यांची वनडे आणि टी२० मालिका होणार आहे. त्यानंतर ४ सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. त्याकरिता बीसीसीआयने सोमवारी (२६ ऑक्टोबर) तिन्ही संघाची निवड केली आहे. मात्र निवडकर्त्यांनी भारतीय कसोटी संघाची निवड करताना सर्वांना थक्क करणारे काही निर्णय घेतले आहेत.
या लेखात आम्ही त्याच चार निर्णयांचा आढावा घेतला आहे. चला तर पाहूया…
सिराजला कसोटी संघात स्थान
डिसेंबर महिन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (कसोटी मालिका) होणार आहे. भारतीय कसोटी संघ निवडकर्त्यांनी प्रमुख वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि इशांत शर्मा यांना दुखापतीमुळे संघात स्थान दिलेले नाही. त्यामुळे उमेश यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि नवदिप सैनी यांची कसोटी संघात निवड करण्यात आली आहे.
मात्र त्यांनी ५वा वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद सिराजच्या नावाचा समावेश करत सर्वांना अनपेक्षित असा निर्णय घेतला आहे.
वेगवान गोलंदाजी अष्टपैलूची कमतरता
ऑस्ट्रेलियाची मैदाने वेगवान गोलंदाजी अष्टपैलू क्रिकेटपटूंसाठी सोईस्कर आहेत. मात्र बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या १८ खेळाडूंच्या भारतीय कसोटी संघात एकाही वेगवान गोलंदाजी अष्टपैलू क्रिकेटपटूची निवड केलेली नाही. हार्दिक पंड्या याला टी२० आणि वनडे संघात स्थान देण्यात आले आहे. परंतु त्याची कसोटी संघात मात्र निवड करण्यात आलेली नाही. तसेच, शिवम दुबेही भारतीय कसोटी संघाचा भाग नाही. हे दोन्ही क्रिकेटपटू वेगवान गोलंदाजी अष्टपैलू क्रिकेटपटू आहेत.
तीन फिरकी गोलंदाजांची निवड
मागील आकडेवारींना पाहिले तर, ऑस्ट्रेलियाच्या मैदानांवर वेगवान गोलंदाजांचा बोलबाला असतो. मात्र भारतीय संघ निवडकर्त्यांनी कसोटी संघात १-२ नव्हे तर ३ फिरकीपटूंनी निवड केली आहे. आर अश्विन, कुलदिप यादव आणि रविंद्र जडेजा हेच ते ३ फिरकीपटू आहेत. मात्र तेथील खेळपट्टीला पाहता, २ फिरकीपटू आणि एका अतिरिक्त वेगवान गोलंदाजाची निवड करणे अधिक योग्य ठरले असते.
पृथ्वी शॉची केली निवड
आयपीएलच्या तेराव्या हंगामात युवा खेळाडू जबरदस्त प्रदर्शन करत आहेत. पृथ्वी शॉनेही आयपीएलच्या तेराव्या हंगामाच्या सुरुवातीच्या काही सामन्यात जोरदार कामगिरी केली होती. मात्र पुढे त्याची फलंदाजी कमाल दाखवण्यात अयशस्वी ठरली. काही सामन्यात तो शून्य धावेवर पव्हेलियानला परतला होता. त्याने आयपीएलच्या या हंगामात आतापर्यंत १० सामन्यात केवळ २०९ धावा केल्या आहेत. एवढेच नव्हे तर, शॉ मागील न्यूझीलंड दौऱ्यावरही फ्लॉप ठरला होता. तरीही त्याला कसोटी संघात स्थान दिल्यामुळे सर्वजण थक्क झाले आहेत.
ट्रेंडिंग लेख-
वॉर्नरच्या आईने ‘तो’ एक निर्णय बदलला नसता तर जगाला दिग्गज क्रिकेटपटू मिळाला नसता!
अन् दत्ता गायकवाडांचा ‘पठ्ठ्या’ इरफान भारतीय संघाचा पुढचा कपिल होता होता राहिला…
कुमार संगकारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बावनकशी सोनं
महत्त्वाच्या बातम्या-
काय सांगता! एबी डिविलियर्सची ‘या’ प्रसिद्ध टी२० लीगमधून माघार
कर्नाटकचा गोलंदाज ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सला नाचवणार फिरकीच्या तालावर, म्हणाला ‘हे तर स्वप्न…’
‘IPLच्या कामगिरीवर कधीपासून कसोटीत निवड होऊ लागली?’ राहुलच्या निवडीवरुन माजी क्रिकेटपटूचे ताशेरे