---Advertisement---

कोण आहे आयपीएलमध्ये पहिल्यांदा खेळणारा अमेरिकन क्रिकेटर? जाणून घ्या ५ रोमांंचक गोष्टी

On: रविवार, सप्टेंबर 13, 2020 3:31 PM
---Advertisement---

कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाला इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२०ची सुरुवात होण्यापुर्वी मोठा झटका बसला आहे. त्यांचा दमदार वेगवान गोलंदाज हॅरी गर्नी हा आयपीएलमधून बाहेर पडला आहे. त्याच्या खांद्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला हा निर्णय घ्यावा लागला. अशात गर्नीची उणीव भरुन काढण्यासाठी केकेआरने अमेरिका क्रिकेट संघाच्या अली खानला संघात दाखल केले आहे.

त्यामुळे, यापुर्वी कुणालाही माहिती नसलेला हा अली खान नक्की आहे तरी कोण? केकेआरने त्यालाच संघात स्थान का दिले? असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात उद्भवले असतील. या लेखात, अली खानविषयीच्या या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला नक्कीच मिळतील. आम्ही या लेखात, अली खानविषयीच्या ५ गोष्टींचा आढावा घेतला आहे. 5 Unknown Facts About Ali Khan…

तर जाणून घेऊया…

पाकिस्तानमध्ये जन्मला होता अली खान 

अमेरिकेचा वेगवान गोलंदाज अली खान याचा जन्म १३ डिसेबंर १९९० रोजी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात झाला होता. त्याने पाकिस्तानच्या गल्लीमध्ये क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. त्यानंतर त्याचे पूर्ण कुटुंब अमेरिकेला स्थायी झाले. त्यानंतर अली खानला पहिल्यांदा अमेरिका क्रिकेट संघाकडून एका टूर्नामेंटमध्ये खेळण्यासाठी बोलावण्यात आले.

अली खानने त्या टूर्नामेंटमध्ये शानदार गोलंदाजी प्रदर्शन करत सर्वांचे लक्ष वेधले होते. पुढे आयसीसीने अमेरिकामध्ये क्रिकेटचा विस्तार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अली खानला अमेरिका राष्ट्रीय संघाकडून क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. तो सध्या अमेरिका क्रिकेट संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज आहे.

सीपीएल पदार्पणाच्या सामन्यातच केले होते कुमार संगाकाराला बाद 

अली खानला २०१६ साली कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल)च्या गयाना अमेझॉन वॉरियर्स संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. तेव्हा त्याने आपल्या सीपीएल पदार्पणाच्या सामन्यात पहिल्या चेंडूवर श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज कुमार संगकाराची विकेट चटकावली होती. ती त्याची पूर्ण हंगामातील एकमेव विकेट ठरली होती.

अली खानने त्या सामन्यात ३.५ षटके गोलंदाजी करत ४९ धावा दिल्या होत्या. त्यावेळी त्याचा इकोनॉमी रेट हा १२.७८ इतका होता. त्यानंतर अली खानने आतापर्यंत सीपीएलमध्ये ३१ सामने खेळत ३५ विकेट्स चटकावल्या आहेत. यावेळी त्याचा इकोनॉमी रेट हा ८.३३ इतका होता.

चेंडूला दोन्ही बाजूने करु शकतो स्विंग, आहे टी२० स्पेशलिस्ट

अली खानच्या गोलंदाजीची विशेषता ही आहे की, तो चेंडूला दोन्ही बाजूने स्विंग करु शकतो. तसेच तो खूप चांगला यॉर्कर टाकू शकतो, ज्यामुळे तो सहज फलंदाजांना त्रिफळाचीत करु शकतो. सोबतच तो सामन्याच्या सुरुवातीच्या षटकात आणि डेथ ओव्हरमध्येही गोलंदाजी दमदार प्रदर्शन करु शकतो.

यावर्षीच्या सीपीएल हंगामातही अली खानने फलंदाजांना मोठ्या संकटात टाकले होते. त्याने आपल्या वेगवान गोलंदाजीने फलंदाजांना सतावत ८ विकेट्सची आपल्या खात्यात नोंद केली होती. तो सीपीएल २०२०च्या विजेत्या ट्रिबँगो नाईट रायडर्स संघाचा भाग होता.

अशी आहे अली खानची क्रिकेट कारकिर्दीतील आकडेवारी

अली खानने अमेरिका क्रिकेट संघाकडून आतापर्यंत केवळ १ वनडे सामना खेळला आहे. हा सामना २७ एप्रिल २०१९ला पपुआ न्यू गिनी संघाविरुद्ध खेळण्यात आला होता. त्यात त्याने ४.६०च्या इकोनॉमी रेटने १ विकेट चटकावली होती.

तर, अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्याने ९ सामने खेळत २३ विकेट्स घेतल्या आहेत. देशांतर्गत स्तरावरील टी२० क्रिकेटमधील त्याची आकडेवारी उल्लेखनीय आहे. आजवर अली खानने ३६ देशांतर्गत टी२० सामने खेळत ३८ विकेट्स चटकावल्या आहेत.

खेळल्यात अनेक मोठ्या टी२० लीग

अली खान जगातील अनेक टी२० लीगमध्ये खेळला आहे. कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये तो गयाना अमेझॉन वॉरियर्स आणि ट्रिबॅगो नाईट रायडर्स संघाकडून खेळला आहे. तर, पाकिस्तान सुपर लीगमध्ये तो कराची किंग्स संघाकडून खेळला आहे.

बांग्लादेश प्रीमियर लीगमध्ये तो खुलाना टायटन संघाकडून खेळला आहे. कॅनडा ग्लोबल टी२० लीगमध्ये तो वेक्युर नाइट्स आणि विम्पिंग हग्स संघांचा भाग होता. अफघानिस्तान प्रीमियर लीगमध्ये काबुल जव्नान संघाचा भाग होता. तर, युएईत खेळल्या जाणाऱ्या टी२० लीगमध्ये तो दिल्ली बुल्स आणि बंगाल टायगर्स संघाकडून खेळला आहे.

अशाप्रकारे अली खानला बऱ्याच टी२० लीगमध्ये खेळण्याचा अनुभव आहे.

ट्रेंडिंग लेख-

दुसऱ्या काळात जन्न्मला असता, तर तो भारताचा अव्वल फिरकीपटू असता

हेअरबँड घालून ऑस्ट्रेलियाला दोन-दोन विश्वचषक जिंकून देणारा दुर्लक्षित शिलेदार

इरफानला एकाच ओव्हरमध्ये २४धावा कुटणारा ‘ज्युनियर सेहवाग’ आयपीएल गाजवायला सज्ज

महत्त्वाच्या बातम्या-

आरसीबीचा कर्णधार विराटने ‘या’ गोष्टीवर आधीपासूनच लक्ष दिले असते तर आज…

ऑस्ट्रेलिया इंग्लंड यांच्यात आज दुसरा वनडे सामना; जाणून घ्या सर्वकाही…

‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया लवकरच तुम्हाला तुमची चुक कळेल,’ भारतीय दिग्गजाने साधला थेट बोर्डावर निशाणा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---