जागतिक क्रिकेटमध्ये फलंदाजाची खरी ओळख जर कशावरुन होत असेल ती अर्थातच त्याच्या सरासरीवरुन. आकडे कितीही खोट बोलत नसतील तरी या आकड्यांमधील सरासरी हा सर्वात महत्त्वाचा घटक येतो.
कसोटी, वनडे किंवा टी२० या प्रकारात ४५च्या पुढील सरासरी ही अतिशय चांगली समजली जाते. वनडे व टी२०मध्ये अशी सरासरी राखण तर त्याहुन कठीण असत. परंतु जगात असा एकमेव खेळाडू आहे ज्याने क्रिकेटच्या तिनही प्रकारात ५० पेक्षा अधिक सरासरी राखली आहे.
तो खेळाडू अर्थातच विराट कोहली. विराटने ८६ कसोटीत ५३.६२च्या सरासरीने ७२४० धावा केल्या आहेत. वनडेत २४८ सामन्यात ५९.३३च्या सरासरीने ११८६७ तर टी२० मध्ये ८२ सामन्यात ५०.८०च्या सरासरीने २७९४ धावा केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
–५ लोकप्रिय क्रिकेटर, ज्यांनी वनडेत केले आहे केवळ एक शतक
–जगातील ३ असे दिग्गज फलंदाज ज्यांना वनडेत करता आले नाही शतक
–शतक कायमचे रुसलेले पण वनडेत सर्वाधिक धावा करणारे ३ भारतीय फलंदाज
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग १५: शंभर कसोटी सामन्यांच्या उंबरठ्यावर असणारा इशांत शर्मा
-शतक कायमचे रुसलेले पण वनडेत सर्वाधिक धावा करणारे ३ भारतीय फलंदाज
-आणि वैतागलेल्या इरफान पठाणने शेअर केले थेट स्क्रीनशाॅट