---Advertisement---

५०० विकेट्स घेणाऱ्या ब्रॉडने केले आहे तब्बल एवढ्या फलंदाजांना क्लिन बोल्ड

On: मंगळवार, जुलै 28, 2020 5:18 PM
---Advertisement---

वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या विसडन चषक कसोटी मालिकेतील तिसऱ्या व निर्णायक कसोटी सामन्यातील आजच्या पाचव्या दिवशी इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडने इतिहास रचला. ब्रॉडने आज कसोटी कारकिर्दीतील ५००वी विकेट्स घेण्याचा कारनामा केला. वेस्ट इंडिजचा क्रेग ब्रेथवेट त्याची ५००वी विकेट ठरला.

अशी कामगिरी करणारा तो जगातील ७वा गोलंदाज ठरला तर वेगवान गोलंदाजांमध्ये अशी कामगिरी करणारा तो जेम्स अँडरसन, ग्लेन मॅकग्रा व कर्टनी वॉल्शनंतरचा चौथा गोलंदाज ठरला. इंग्लंडकडून कसोटीत ५०० विकेट्स घेणारा तो जेम्स अँडरसन नंतरचाही दुसराच गोलंदाज ठरला.

१३वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत त्याने १४०व्या कसोटीत हा टप्पा पार केला. सध्या खेळत असलेल्या गोलंदाजांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदांत तो जेम्स अँडरसननंतर दुसऱ्या स्थानावर आहे.

स्टुअर्ट ब्रॉडच्या ५०० विकेट्सपैकी २०९ विकेट्सवेळी क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूने झेल फलंदाजाचा झेल घेतला आहे. तर ११७ वेळा यष्टीरक्षकाने झेल घेतला आहे. तब्बल ८८ फलंदाजांना ब्रॉडने त्रिफळाचीत केले आहे तर ८२ फलंदाज पायचीत झाले आहेत.

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---