---Advertisement---

पंचहजारी फिंच! भारताविरुद्धच्या वनडे सामन्यात केला खास विक्रम

---Advertisement---

सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील वनडे मालिकेला शुक्रवारपासून(२७ नोव्हेंबर) सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने एक खास विक्रम केला आहे.

फिंचने या सामन्यात डेविड वॉर्नरसह ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात केली. या दोघांनीही चांगली सुरुवात करताना शतकी भागीदारी रचली. तसेच फिंचने अर्धशतकी खेळीही केली आहे. याचवेळी फिंचने त्याच्या वनडे कारकिर्दीत ५००० धावांचा टप्पाही पार केला आहे. हा टप्पा पार करणारा तो ऑस्ट्रेलियाचा १६ वा खेळाडू आहे.

५००० धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज –

त्याने १२६ व्या वनडे डावात खेळताना हा कारनामा केला आहे. त्यामुळे तो वनडेमध्ये सर्वात जलद ५००० धावा करणारा ऑस्ट्रेलियाचा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे. या यादीत त्याने माजी क्रिकेटपटू डिन जोन्स यांना मागे टाकले आहे. जोन्स यांनी १२८ डावात ५००० वनडे धावांचा टप्पा पार केला होता. तर या यादीत अव्वल क्रमांकावर फिंचचा सलामीवीर साथीदार डेविड वॉर्नर आहे. वॉर्नरने ११५ डावात ५००० धावांचा टप्पा पार केला होता.

पहिल्या वनडेत ऑस्ट्रेलियाने जिंकली नाणेफेक –

या सामन्यातून भारतीय संघाने कोरोनाच्या संकटानंतर जवळपास ७ महिन्यांनी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

महत्त्वाच्या बातम्या –

कहर! पहिल्या वनडे सामन्यात भारत-ऑस्ट्रेलिया संघ चक्क अनवाणी पायांनी मैदानात

पहिल्या वनेडत नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाचा फलंदाजीचा निर्णय, शिखरबरोबर ‘हा’ खेळाडू येणार सलामीला

ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेत विराटच्या निशाण्यावर सचिन आणि पॉन्टिंगचे मोठे विक्रम

ट्रेंडिंग लेख –

‘बर्थडे बॉय’ सुरेश रैनाबद्दल या खास १० गोष्टी माहित आहेत का?

क्रिकेटमध्ये ६ वर्षांपूर्वी घडली होती ‘ती’ वाईट घटना ज्यामुळे हेलावले होते क्रिकेट जगत

…म्हणून सुरेश रैना आहे जगातील सर्वात दिलदार व निस्वार्थी क्रिकेटर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---