पुणे: बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित १५व्या श्री महेश्वरानंद सरस्वती मेमोरियल अखिल भारतीय खुल्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत देशभरांतून १९२खेळाडूंमध्ये आयएम सत्यप्रग्यान स्वयंगसू(२४०८), आयएम रत्नकरण के(२३८१), आयएम अभिषेक केळकर(२३५९), आयएम समीर कठमाले(२३५७) आणि आयएम विक्रमादित्य कुलकर्णी(२२१५) हे पाच आंतरराष्ट्रीय मास्टर्स झुंजणार आहेत. हि स्पर्धा अश्वमेध सभागृह, कर्वे रोड, पुणे येथे २५ ते ३० सप्टेंबर २०१८ या कालावधीत रंगणार आहे.
बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टचे ट्रस्टी प्रकाश कुंटे यांनी सांगितले कि, हि स्पर्धा एआयसीएफ यांच्या मान्यतेखाली होत असून स्पर्धेत एकूण ३लाख ६०हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्वीस लीग फॉरमॅट प्रमाणे खेळण्यात येणाऱ्या या स्पर्धेत एकूण १०फेऱ्या होणार आहेत.
स्पर्धेतील विजेत्याला ३लाख रुपये व करंडक, उपविजेत्याला ६०हजार रुपये व करंडक, तृतीय क्रमांकाच्या विजेत्याला ३५हजार रुपये व करंडक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे. स्पर्धेचे उदघाटन एएमसीएचे सचिव, आमदार मेधा कुलकर्णी आणि पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक जयंत भावे यांच्या हस्ते होणार आहे. ग्रँडमास्टर अभिमन्यू पुराणिक आणि आयएम सौम्या स्वामिनाथन यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
स्पर्धेतील अव्वल ७ खेळाडूंची यादी खालीलप्रमाणे:
ग्रँडमास्टर सुंदराजन किदांबी(२४३३),आयएम सत्यप्रग्यान स्वयंगसू(२४०८), आयएम रत्नकरण के(२३८१), आयएम अभिषेक केळकर(२३५९), आयएम समीर कठमाले(२३५७), आयएम विक्रमादित्य कुलकर्णी(२२१५), डब्लूआयएम चंद्राई हजरा(१९५७)