नाॅटिंगहॅम | बुधवारी इंग्लंड विरुद्ध आॅस्ट्रेलिया तिसऱ्या वनडेत इंग्लंडने वनडेमधील सर्वोच्च धावसंख्या उभारली. त्यांनी ५० षटकांत ६ बाद ४८१ धावा केल्या.
ही वनडे क्रिकेट इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या आहे. यापुर्वी ३० आॅगस्ट २०१६मध्ये याच संघाने पाकिस्तान संघाविरुद्ध ५० षटाकांत ३ बाद ४४४ धावा केल्या होत्या.
आॅस्ट्रेलियाला २३९ धावांवर रोखत इंग्लंड संघाने २४२ धावांनी विजय मिळवला. हा इंग्लंडचा वनडेतील सर्वात मोठा विजय आहे.
या सामन्यात जाॅनी ब्रेस्टाॅने आपल्या वनडे कारकिर्दीतील ६वे शतक केले. त्याने ही सर्व शतके १०० पेक्षा कमी चेंडूत केली आहेत. अशी कामगिरी करणारा तो जगातील तिसरा खेळाडू ठरला आहे.
आजपर्यंत आपण वनडेत अनेक विक्रम पाहिले आहेत. काही विक्रम हे आपण कधीही ऐकलेले नसतात तर काही विक्रम हे आपण कधी विचार केला नसेल असे असतात.
दक्षिण अाफ्रिकेचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज एबी डी विलीयर्सने २२८ वनडेत २१८ डावात फलंदाजी करताना २५ शतके आणि ५३ अर्धशतके केली आहेत.
ही २५ शतके करताना त्याने कधीही ९९ पेक्षा जास्त चेंडू घेतले नाहीत. जागतिक क्रिकटमध्ये शतक जसं जवळ येईल तसे बरेच खेळाडू संथ खेळतात. परंतु २५ शतके करताना कधीही ९९ चेंडू पेक्षा जास्त चेंडू न खेळल्यामुळे एक अजब विक्रम त्याच्या नावावर जमा झाला आहे.
अन्य खेळाडूंमध्ये ईजाज अहमद (१०), शाहीद अाफ्रिदी (०६), जाॅनी ब्रेस्टाॅ (६), जोस बटलर (५) आणि जेपी ड्यूमीनी (४) यांचा समावेश आहे.
जाॅनी ब्रेस्टाॅने इंग्लंडकडून खेळताना गेल्या ६ डावात ४ शतके केली आहेत.
आजच्या दिवसातील सर्वात महत्त्वाच्या बातम्या-
-अर्जून तेंडूलकरबद्दलची ही आहे दिवसातील सर्वात मोठी बातमी
-पृथ्वी शाॅ पुन्हा गरजला, २० चौकार आणि ३ षटकारांची आतिषबाजी
-अबब ! इंग्लंडने आॅस्ट्रेलियाला पाजले पाणी; वनडेत चोपल्या ४८१ धावा
-धावा केल्या इंग्लंडने ४८१; टेन्शन घेतलंय या भारतीय माजी कर्णधारान
-४८१ धावा तर केल्या; परंतु अजून १६ धावा केल्या असत्या तर इतिहास घडला असता!






