यंदाची आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी (ICC Champions Trophy 2025) (19 फेब्रुवारी) पासून सुरू आहे. शुभारंभ सामन्यातच पाकिस्तान-न्यूझीलंड संघ आमने-सामने असणार आहेत. ही स्पर्धा 8 वर्षांनी परतणार आहे, जी (9 मार्च) पर्यंत खेळवली जाईल. त्यानंतर काही दिवसांनी आयपीएल (IPL 2025) सुरू होईल.
तत्पूर्वी आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बक्षीस रकमेची घोषणा केली आहे, पण असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांचे आयपीएल पगार चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बक्षीस रकमेपेक्षा जास्त आहे, तर तुम्ही त्यावर विश्वास ठेवाल का? यापैकी एक नाव भारताचा स्टार डावखुरा फलंदाज रिषभ (Rishabh Pant) पंतचे देखील आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) अलीकडेच जाहीर केले की, चॅम्पियन्स ट्रॉफीचा बक्षीस संच सुमारे 59 कोटी रुपये असेल. यापैकी विजेत्याला सुमारे 19.45 कोटी रुपये मिळतील. आयपीएल 2025 बद्दल बोलायचे झाले तर, इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामात खेळण्यासाठी एकूण 6 खेळाडूंना 20 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक पगार मिळेल. 2017च्या तुलनेत यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बक्षीस रकमेत 53 टक्के वाढ झाली आहे.
विजेता – 19.45 कोटी रुपये
उपविजेता – 9.72 कोटी रुपये
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बक्षीस रकमेपेक्षा जास्त आयपीएल पगार मिळवणाऱ्या खेळाडूंमध्ये रिषभ पंत हे पहिले नाव आहे. त्याला मेगा लिलावात लखनऊ सुपर जायंट्सने (LSG) 27 कोटी रुपयांना खरेदी केले. यासह तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला.
पंजाब किंग्जने (PBKS) श्रेयस अय्यरसाठी 26.75 कोटी रुपयांची बोली लावली होती. कोलकाता नाईट रायडर्सने व्यंकटेश अय्यरवर 23.75 कोटी रुपयांची बोली लावली होती. पुढील हंगामात 20 कोटींपेक्षा जास्त मानधन मिळणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट कोहली, हेनरिक क्लासेन आणि निकोलस पूरन यांचा समावेश आहे.
रिषभ पंत – 27 कोटी रुपये (LSG)
श्रेयस अय्यर – 26.75 कोटी रुपये (PBKS)
व्यंकटेश अय्यर – 23.75 कोटी (KKR)
हेनरिक क्लासेन – 23 कोटी रुपये (SRH)
विराट कोहली – 21 कोटी रुपये (SRH)
निकोलस पूरन – 21 कोटी रुपये (LSG)
महत्त्वाच्या बातम्या-
Champions Trophy; चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी भारतीय संघ दुबईला रवाना…! VIDEO
टीम इंडियावर बुमराहच्या दुखापतीचा काय परिणाम होईल? माजी क्रिकेटपटूचे मोठे विधान
विराट कोहली RCB कर्णधार का नाही बनला? माजी क्रिकेटपटूचा मोठा खुलासा






