आयपीएल म्हटलं की केवळ सामन्यांचीच चर्चा होते असं नाही. गेल्या १३ वर्षात झालेल्या प्रत्येक हंगामात सामन्यांव्यतिरिक्त अन्य गोष्टींवरही अनेकदा चर्चा रंगल्या आहेत. मग ते वाद असो की अन्य कोणत्या गोष्टी. अशीच एक बऱ्याचदा चर्चेत येणारी गोष्ट म्हणजे सामन्यादरम्यान दिसणारी एखादी मिस्ट्री गर्ल. सामना सुरु असताना सातत्याने कॅमेरा तिच्याकडे जात असल्याने ती मुलगी कोण अशी चर्चा रंगायला सुरुवात होते आणि एका रात्रीत त्या मुलीला प्रसिद्धी मिळते. तिचे सोशल मीडियावरही अनेक फॉलोवर्स वाढतात.
या लेखात अशा ६ मिस्ट्री गर्लबद्दल जाणून घेऊ ज्या आयपीएल सामन्यादरम्यान दिसल्या आणि रातोरात स्टार झाल्या.
६. रियाना लालवानी –
आयपीएल २०२० चा ३८ वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात झाला. या सामन्यात एक ‘मिस्ट्री गर्ल’ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली होती. या मुलीचे नाव रियाना लालवानी आहे. रियाना दुबईत राहते. या सामन्यानंतर रियानाच्या फॅन फॉलोविंगमध्ये भलतीच वाढ झाली आहे. इंस्टाग्रामवर तिच्या फॉलोवर्समध्ये ५० हजारांपेक्षा अधिक फॉलोवर्स झाले आहेत.
५. राखी कपूर-टंडन
आयपीएल २०१५ च्या अंतिम सामन्यादरन्यान एका मिस्ट्री गर्लचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. ती खेळाडूंना पुरस्कार देताना दिसली होती. पण सामन्यानंतर कळाले की ती येस बँकेचे फाऊंडर आणि सीइओ राणा कपूर यांची मुलगी राखी कपूर-टंडन आहे.
४. आदिती हुंडिया –
आयपीएलच्या १२ व्या हंगामादरम्यान म्हणजेच मागीलवर्षी एक सुंदर सोशल मीडिवार बरीच व्हायरल झाली होती. ती मुगली म्हणजे आदिती हुंडिया. ती मुंबई इंडियन्सला पाठिंबा देताना दिसली होती. ती एक मॉडेल असून मुंबईचा युवा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनची गर्लफ्रेंड आहे. २०१७ मध्ये तिला मिस इंडिया राजस्थान किताब मिळाला आहे. तसेच तिने पोलंड येथे मिस सुपरनॅशनल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
३. दीपिका घोष
आदितीबरोबरच मागील आयपीएल हंगामात दीपिका घोषबद्दलही बरीच चर्चा झाली होती. ती रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पाठिंबा देताना दिसली होती. त्या सामन्यातील तिचे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले होते. तसेच त्या सामन्यानंतर काही तासातच तिचे इंस्टाग्रामवर चौपट फॉलोवर्स वाढले होते.
२. मालती चाहर –
आयपीएल २०१८ च्या हंगामात मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघाच्या सामन्यादरम्यान मालती चाहर बरीच चर्चेत आली होती. तसेच तिने एमएस धोनीबरोबरील फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केल्याने ती नक्की कोण आहे? असे प्रश्न विचारले जात होते. पण नंतर सर्वांना कळाले की ती एक मॉडेल असून दिपक चाहर आणि राहुल चाहर या भारतीय खेळाडूंची बहीण आहे. दिपक आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळतो तर राहुल मुंबईकडून खेळतो.
१. काव्या मारन –
२०१८ च्या आयपीएल दरम्यान चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघात झालेल्या अंतिम सामन्यावेळी एक मुलगी चर्चेत आली होती, जी हैदराबाद संघाला पाठिंबा देत असलेली दिसली होती. ही मुलगी सनरायझर्स हैदराबाद संघाचे मालक कलानिधी मारन यांची मुलगी काव्या मारन होती. ती आयपीएल लिलावादरम्यानही दिसली होती. तसेच ती तिच्या वडिलांच्या व्यवसायातही मदत असते.
महत्त्वाच्या बातम्या –
वडिलांच्या अंत्यसंस्काराला दुबईत असलेला आयपीएल स्टार व्हिडिओ कॉलद्वारे सहभागी
हेल्मेटवर चेंडू लागल्याने विजय शंकर मैदानावरच कोसळला अन् चाहत्यांचा काळजाचा ठोका चुकला
Video: अफलातून! पंजाबच्या धुरंदराने चपळाई दाखवत ‘दबंग’ पांडेला धाडलं तंबूत
ट्रेंडिंग लेख –
कमी धावा झाल्या म्हणून काय झालं! त्यातूनही मार्ग काढून थरारक विजय मिळवणारे ५ संघ
असा देवमाणूस; ज्याने भारतीय संघाला शिकवले सामने जिंकण्याचे सायन्स
आयपीएल२०२० मध्ये सर्वात वेगवान अर्धशतक झळकवणारे ४ खेळाडू; एका भारतीयाचाही समावेश