कोरोना विषाणूमुळे क्रिकेटच जग थांबल होत. त्यामळे आयपीएल स्पर्धाही स्थागित करण्यात आली होती. परंतु अखेर आयपीएल २०२० स्पर्धा १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये होणार आहे. या मोसमासाठी लिलावा दरम्यान सर्व संघांनी एकापेक्षा एक चांगले खेळाडू विकत घेऊन आपल्या संघाची बाजू मजबूत केली आहे.
यावेळी, काही संघांमध्ये आयपीएलचा अनुभव असलेल्या काही खेळाडूंसह काही नवीन खेळाडूंचा समावेश आहे. क्रिकेट विश्वात असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. तसेच दरवर्षी बरेच नवीन खेळाडू आयपीएलमध्ये पदार्पण करतात आणि यावर्षीही काही मोठे खेळाडू आयपीएलमधील पहिला सामना खेळतील.
तर या लेखात त्या ६ खेळाडूंबद्दल जाणून घेऊ जे आयपीएल २०२० मध्ये कारकिर्दीतील पहिला आयपीएल सामना खेळतील.
६. देवदत्त पडिक्कल – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
भारताच्या युवा खेळाडूंमध्ये देवदत्त पडिक्कलचे नाव आहे. या खेळाडूने अतिशय कमी वेळात आपल्या देशांतर्गत क्रिकेट कारकिर्दीत चमकदार कामगिरी केली आहे. देवदत्तने आतापर्यंत कारकीर्दीतील १५ प्रथम श्रेणी सामन्यातील २९ डावांमध्ये ३४.९ च्या सरासरीने ९०७ धावा केल्या आहेत.
याशिवाय ट्वेंटी२० कारकीर्दीतही त्याने चांगली कामगिरी केली आहे. ट्वेंटी२० क्रिकेटमध्ये देवदत्तने आतापर्यंत १२ सामन्यांत एका शतकांसह १७५.७५ च्या स्ट्राइक रेटने एकूण ५८० धावा केल्या आहेत.
हेच कारण होते की रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्याला २०१९ च्या हंगामात २० लाख रुपयांत विकत घेतले, जरी त्याला मागील मोसमात खेळण्याची संधी मिळाली नसली तरी त्याचा फॉर्म पाहता असे म्हणता येईल की आयपीएल २०२० मध्ये तो त्याच्या संघाच्या वतीने निश्चितपणे फलंदाजीसाठी मैदानात प्रवेश करु शकतो.
५. टॉम बँटन – कोलकाता नाईट राइडर्स
कोलकाता नाईट रायडर्सने इंग्लंडचा युवा तुफानी सलामीवीर फलंदाज टॉम बँटनला १ कोटीची बोली लावून विकत घेतले आहे. तो काही काळापासून तो शानदार प्रदर्शन करीत आहे. टॉम बँटनने बिग बॅश लीगमध्येही भाग घेतला होता.
त्यावेळी, एका सामन्यात या खेळाडूने केवळ १६ चेंडूत अर्धशतक झळकावून आपली प्रतिभा दाखविली. त्या सामन्यात त्याने एका षटकात सलग ५ षटकारही ठोकले.
२०२० च्या आयपीएलमध्ये तो केकेआर संघासाठी महत्वाची भूमिका निभावू शकतो. त्यामुळे हा तरुण खेळाडू आयपीएल २०२० मध्ये पदार्पण करण्यास सक्षम आहे.
४. शेल्डन कॉटरल – किंग्ज इलेव्हन पंजाब
किंग्ज इलेव्हन पंजाबने वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज शेल्डन कॉटरलला ८.५ कोटींच्या प्रचंड किंमतीत खरेदी केले आहे. लिलाव होण्यापूर्वी अशी चर्चा होती की कॉटरलला मोठी रक्कम मिळणार आहे आणि असेच काहीसे घडले. गेल्या काही वर्षांत कॉटरलची कामगिरी नेत्रदीपक ठरली.
पंजाबमध्ये परदेशी गोलंदाजांची कमतरता होती आणि त्यांनी वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज विकत घेऊन कमतरता भरुन काढण्याचा प्रयत्न केला. सीपीएलमध्ये कॉटरलने शानदार गोलंदाजी केली होती, त्याने केवळ ८ सामन्यांत १२ गडी बाद केले होते.
कॉटरल मोहम्मद शमीसह पंजाबसाठी जबरदस्त कामगिरी करू शकतो. वेस्ट इंडीजच्या या खेळाडूने त्यांच्या पहिल्या आयपीएल मोसमात पंजाब संघाचे यशस्वी प्रतिनिधित्व करावे ही पंजाबच्या चाहत्यांना नक्कीच इच्छा असेल.
३. ऋतुराज गायकवाड – चेन्नई सुपर किंग्ज
ऋतुराज गायकवाड हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्र संघाचा सलामीवीर आहे. तो महाराष्ट्र संघाच्या वतीने सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. या व्यतिरिक्त तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०१८-१९ मध्ये महाराष्ट्रासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता.
याशिवाय त्याच्या प्रथम श्रेणी क्रिकेट कारकीर्दीतील २१ सामन्यांत १३ शतके आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी२० कारकीर्दीत त्याने २८ सामन्यांत १३५ पेक्षा अधिक स्ट्राइक रेटने एकूण ८४३ धावा केल्या आहेत.
अशा परिस्थितीत ऋतुराज गायकवाड येत्या हंगामात चेन्नईचा युवा फलंदाज म्हणून दिसू शकेल. म्हणून हा खेळाडूसुद्धा आयपीएल २०२० मध्ये पदार्पण करताना दिसू शकतो.
२. अॅलेक्स कॅरी – दिल्ली कॅपिटल्स
ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज अॅलेक्स कॅरीने शानदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियासाठी पाचव्या आणि सहाव्या स्थानावर फलंदाजी केली आहे. हा खेळाडू यंदा दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसेल. तर दिल्ली कॅपिटल्समध्ये सुरुवातीच्या फळीत भारतीय खेळाडू आहेत.
शेवटी, संघाला एक चांगला फलंदाज हवा होता जो कमी चेंडूत जास्तीत-जास्त धावा करू शकेल. आयपीएल २०२० मध्ये शिमरॉन हेटमीयरला दिल्ली संघ पहिली संधी दिली जाण्याची शक्यता आहे. जर तो यशस्वी झाला नाही तर अॅलेक्सला आयपीएलमधील पहिला सामना खेळण्याची संधी मिळू शकेल.
जर रीषभ पंत काही कारणास्तव सामना खेळत नसेल तर कॅरी यष्टीरक्षक म्हणूनही खेळू शकतो. याच कारणास्तव हा फलंदाज आयपीएल २०२० मध्ये पदार्पण करू शकतो.
१. यशस्वी जयस्वाल – राजस्थान रॉयल्स
आयपीएलमध्ये या हंगामात पदार्पण करणाऱ्या युवा खेळाडूंपैकी यशस्वी जयस्वाल हा पहिला खेळाडू असेल. नुकत्याच पार पडलेल्या १९ वर्षाखालील विश्वचषकात यशस्वी जयस्वालने शानदार कामगिरी केली. त्याने त्या स्पर्धेच्या ६ सामन्यात ४०० धावा करून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. इतकेच नाही तर जयस्वालने १९ वर्षांखालील विश्वचषकातील उपांत्य सामन्यात पाकिस्तानविरुद्ध शानदार शतक झळकावले.
जयस्वाल हा अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये दुहेरी शतक ठोकणारा सर्वात तरुण खेळाडू आहे. जयस्वालला राजस्थान रॉयल्सने यावेळी आयपीएलच्या लिलावात अडीच कोटींपेक्षा जास्त किंमतीला विकत घेतले. या खेळाडूकडून राजस्थानला बरीच बरीच अपेक्षा असेल. त्यामुळे तोही आयपीएलमध्ये यावेळी पदार्पण करताना दिसू शकतो.
ट्रेंडिंग लेख –
रोहित-विराटला मागे टाकून आयपीएलमध्ये सर्वाधिक सरासरीने धावा करणारे हे ५ फलंदाज…
सर्वाधिक सलग कसोटी सामने खेळणारे ३ दिग्गज भारतीय क्रिकेटपटू
आयपीएल खेळणारे हे ३ खेळाडू बजावू शकतात भारतीय संघासाठी अष्टपैलू खेळाडूची भूमिका…