आशिया खंडातील अनेक देशांत क्रिकेट हा एक लोकप्रिय खेळ आहे. यात पाकिस्तान देशाचा देखील समावेश आहे. पाकिस्तानमधूनही अनेक प्रतिभाशाली आणि दिग्गज क्रिकेटपटू पुढे आले आहेत. याच पाकिस्तानमधील एका ६ वर्षांच्या मुलाचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
कादिर क्वाजा या ट्विटरकर्त्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्याने लिहिले आहे की ‘पाकिस्तामधील खरे कौशल्य. तो केवळ ६ वर्षांचा असून लाहोरमध्ये राहातो. त्याचा कव्हर ड्राईव्ह, कट शॉट, पुल शॉट पाहा, सुरेख आहेत. बाबर आझम आणि मोहम्मद युसूफ हे आवडते फलंदाज आहेत.’
या व्हिडिओमध्ये तो ६ वर्षांचा मुलगा एखाद्या कसलेल्या फलंदाजाप्रमाणे फलंदाजी करताना दिसत आहे. यात तो कव्हर ड्राईव्ह, कट शॉट अशा काही क्रिकेट शॉट सुरेखरित्या मारत आहे.
त्याला इतके चांगले फटके मारताना पाहून अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. अनेकांनी त्याचे कौतुक करत भविष्यातील तारा म्हटले आहे. काहींनी तो सचिन तेंडुलकर प्रमाणे खेळत असल्याचेही म्हटले आहे.
Little master Sachin 👍❤️
— Rashid Latif | 🇵🇰 (@iRashidLatif68) April 1, 2021
@sachin_rt ki copy hai….
— Qadir Khawaja (@iamqadirkhawaja) April 1, 2021
https://twitter.com/sehwagfan2/status/1377605112886009863
Ma Shaa Allah, no doubt that it's a great Talend of Pakistan, but should be called him #GodGifted.
In Shaa Allah, one day he will command the team according to show his hidden qualities and skills.
May Almighty Allah keep him healthy and Shine for bright future.
Aameen.🔥💥🇵🇰❤️👍— H.M.Ejaz🇵🇰 (@imMoonofficial) April 3, 2021
Zabardast Masha'ALLAH
— Faisal Javed Khan (@FaisalJavedKhan) April 1, 2021
Excellent batting. Looks to be v intelligent too. Best wishes and prayers for his future.
— Haroon FCMA CPA (@haroon_israr) April 2, 2021
तसेच पाकिस्तानचा माजी कर्णधार सर्फराज अहमद यानेही या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले आहे की ‘खुपच प्रभावी’.
Very impressive Mashallah 😍
— Sarfaraz Ahmed (@SarfarazA_54) April 1, 2021
या व्हिडिओला आत्तापर्यंत ५०० पेक्षाही अधिक रिट्विट आले आहेत. तसेच असा लहान मुलाचा व्हिडिओ व्हायरल होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर वेगवेगळ्या गुणवंत मुलांचे क्रिकेट खेळतानाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात.
महत्त्वाच्या बातम्या –
धोनीविषयी प्रश्न विचारताच ‘असे’ दिले संजू सॅमसनने उत्तर
आजपर्यंत आयपीएलमध्ये अनेक परदेशी खेळाडू खेळले, पण ‘हा’ कारनामा करणारा एबी डिविलियर्स एकमेवच
आयपीएल २०२१ साठी बंगलोरच्या ताफ्यात ‘या’ खास व्यक्तीची झाली नेमणूक