-वरद सहस्रबुध्दे
गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणजे धोनीने निवृत्ती जाहीर करायच्या चार पाच दिवस अगोदर याने एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. एकंदरीतच याचं वय, कारकीर्द आणि सध्याचा फॉर्म याचा विचार करता अनेक जण त्याच्या निवृत्तीबाबत भाकीत करत होते. हे भाकित करणं चुक देखील नव्हतं. पाकिस्तानविरुद्ध पहिल्या कसोटीला त्याला केवळ एकच विकेट मिळाली होती. पण आपल्या आऊटस्विंगने जसा फलंदाजांना कोड्यात पाडतो, फलंदाजांनी ठरवलेले अंदाज चुकवतो तसंच त्याने क्रिकेट रसिकांचे अंदाज चुकवले आणि आपण इतक्यात निवृत्ती जाहीर करणार नाही आणि एक सामना भविष्य ठरवू शकत नाही असे सुतोवाच देखील केले. आज त्याने एक वेगवान गोलंदाज म्हणून केलेली कामगिरी नक्कीच वाखाणण्याजोगी आहे.
खरंतर ५०० विकेट घेणं हीच एका गोलंदाजासाठी स्वप्नवत गोष्ट असते. स्टेनसारखे काही गोलंदाज क्षमता असूनही दुखापतीमुळे हेराथसारखे, उमेदीच्या काळात फारशा संधी न मिळाल्याने ४००- ४५० दरम्यान घुटमळत राहतात. आतापर्यंत ६०० पेक्षा जास्त विकेट घेणारे केवळ तीनच गोलंदाज होते आणि तिघेही फिरकी गोलंदाज. आज त्याने ६०० विकेट्सच्या एलाईट क्लबमध्ये एंट्री मारली आहे. अशी कामगिरी करणारा तो एकूण केवळ चौथा तर वेगवान गोलंदाजांमधील पहिला भीडू ठरला.
जिमी अँडरसन. इंग्लंड क्रिकेटचं एक युगच जणू. आज त्यानेच ही अचाट कामगिरी केली. चूक असेन किंवा हे वाक्य धाडसी वाटेल पण अँडरसन हा कदाचित ६०० विकेट घेणारा शेवटचा गोलंदाज ठरू शकतो. कसोटी क्रिकेटचं भविष्य, संघात स्थान निर्माण करण्यासाठी सुरु असलेल्या स्पर्धा, फलंदाजीला पोषक खेळपट्टी, लीग क्रिकेटचं प्रलोभन, बदललेलं तंत्रज्ञान, इत्यादी अशी अनेक कारणं आहेत ज्यामुळे आगामी काळात पाचशे आणि त्याहुन अधिक विकेट्स मिळवणं कठीण नव्हे तर अशक्य गोष्ट असणार आहे.
सुरुवातीच्या काळात ब्रॉडप्रमाणेच एवढी अँडरसन अशक्यप्राय कामगिरी करेल असं बहुसंख्य लोकांना वाटलं नव्हतं. होगार्ड, फ्लिंटॉफ, हार्मिसन यासारखे बॉलर संघात असताना त्याला फार काही मिळवण्यासाठी नव्हते. तसेच सुरूवातीला काही वर्ष संघातली जागा पक्की नव्हती. २००८ साली त्याला न्यूझीलंडविरूद्ध स्व’त्वाचा शोध लागला आणि तिथून त्याच्या कारकिर्दीच्या गाडीने चांगलाच वेग धरला. सरासरीदेखील दरवर्षी सुधारत गेला.
स्वतःवर असलेला विश्वास आणि आपल्याला कारकिर्दीबाबत उशीरा का होईना झालेली जाणीव यामुळे अँडरसनच्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली. काही काळातच तो इंग्लिश संघाचा स्ट्राईक बॉलर बनला. आपल्या तंत्रशुद्ध गोलंदाजीने, स्विंगने आणि लयबद्ध एक्शनने त्याने क्रिकेट रसिकांना मोहिनी घातली. २००६ एशेसला अपयशी ठरलेल्या जिमीने २०१०-११ साली झालेल्या एशेसध्ये २४ विकेट घेऊन अपयश धुवून काढले. नागपूरच्या गर्मीत शानदार स्पेल टाकला. सचिन तेंडुलकर, संगकारा, क्लार्क वगैरे लोकांना सात पेक्षा जास्त वेळा बाद केलं. इंग्लंडमधील वातावरणात त्याच्या गोलंदाजीला तर अजूनच धार येते. पठ्ठ्याने एकट्या लॉर्ड्सवर शंभराहून अधिक विकेट्स घेतल्यात.
कसोटी क्रिकेटला सर्वोच्च प्राथमिकता देणारे जे काही मोजके खेळाडू सध्या जगाती उरलेत त्यात अँडरसनचं नाव आदराने घेतलं जाईल. आज कसोटी क्रिकेट जे काही इब्रत राखून आहे ते इंग्लिश संघामुळेच. यातील एक शिलेदार अॅलस्टर कूक मागेच निवृत्त झाला. आता त्यात ब्रॉड आणि अँडरसनचा निःसंशय मोलाचा वाटा आहे. जेवढी धावांची भूक जास्त तेवढा तो फलंदाजाला महान मानलं जातं त्याचप्रमाणे विकेटची भूक गोलंदाजाच्या यशाचं मोजमाप ठरू शकते. अँडरसन हे त्यातलंच एक नाव. ती भूकच त्याला सातत्यपूर्ण कमागिरी आणि टिच्चून मारा करण्याची प्रेरणा देतं. इंग्लिश संघाने गेल्या अठरा वर्षात अंदाजे सात कर्णधार बदलले. कूक, फ्रेडी सारखे ग्रेट निवृत्त झाले. तरीही या काळात अँडरसनचं महत्त्व कमी झालेलं नाही किंवा ते त्याने कमी होऊ दिलेलं नाही.
ट्रेंडिंग लेख –
अगदी धोनीसहित या दिग्गजांच्या नशीबात टी२०त कधीही नव्हती मॅन ऑफ द मॅच
असे ३ क्रिकेटर, जे पुण्याच्या दोन वेगवेगळ्या आयपीएल टीमकडून खेळले क्रिकेट
शेवटच्या १० ओव्हरमध्ये धु- धु धुणारे जगातील ५ क्रिकेटपटू
महत्त्वाच्या बातम्या –
नुकतेच २६७ धावांची खेळी करणाऱ्या फलंदाजाच्या वडिलांविषयी पसरली अफवा, खरं काय ते घ्या जाणून
अश्विन पाँटिंगसोबत फोनवर नेमकं काय बोलला? यावेळी होणार खुलासा
अर्जुन अवॉर्ड मिळालेला भारतीय गोलंदाज म्हणतोय, माझी बायकोसुद्धा आहे या अवॉर्डची दावेदार