-आदित्य गुंड
फुटबॉल विश्वकरंडक सुरु होऊन आठवडा उलटून गेलाय तरीही एका गोष्टीवर अजून फारशी चर्चा होताना दिसत नाही. ती गोष्ट म्हणजे विश्वकरंडकाचे अधिकृत वाद्य.काय आहे यंदाच्या विश्वकरंडकाचे अधिकृत वाद्य? तर ते आहे चमचे!
होय. चमचे (रशियन भाषेत लॉझकास) हे रशियातील विश्वकरंडकाचे अधिकृत वाद्य आहे. रशियाने या वाद्याला ‘स्पून्स ऑफ व्हिक्टरी’ असे नाव दिले आहे.
प्रसिद्ध डिझायनर रुस्तम नुग्मानोव्ह यांनी हे वाद्य बनविले आहे. रशियन लोकसंगीतामध्ये या चमच्यांचा वापर १८ व्या शतकापासून होत आला आहे. अलीकडे मात्र चमचे वाजवण्याची ही कला लोप पावत चालली आहे. हीच बाब ध्यानात घेऊन नुग्मानोव्ह यांनी चमचे हे विश्वकरंडकाचे अधिकृत वाद्य असावे अशी संकल्पना मांडली.
पारंपरिक पद्धतीनुसार हे चमचे वाजवण्यासाठी सहसा तीन लाकडी चमच्यांचा वापर केला जातो. हे चमचे आपण रोज वापरत असलेल्या चमच्यांसारखेच मात्र अधिक टिकाऊ असतात. दोन चमचे डाव्या हाताच्या बोटांमध्ये तर तिसरा चमचा उजव्या हातामध्ये पकडला जातो. डाव्या हातात धरलेल्या दोन चमच्यांवर उजव्या हातातील तिसऱ्या चमच्याने मारून येणाऱ्या आवाजातून ठेका धरला जातो आणि त्या ठेक्यावर नृत्य केले जाते.
मात्र विश्वकरंडकासाठी बाहेरच्या देशातून येणाऱ्या प्रेक्षकांना हे चमचे वाजवणे सोपे जावे म्हणून नुग्मानोव्ह यांनी पारंपरिक वाद्यामध्ये थोडे बदल केले आहेत. दोन प्लास्टिकचे चमचे उलट्या बाजूने एकमेकांना इंग्रजी व्ही आकारात जोडून हे वाद्य तयार करण्यात आले आहे. चमचे जोडून तयार होणाऱ्या इंग्रजी व्ही आकारामुळेच या वाद्याला ‘स्पून्स ऑफ व्हिक्टरी’ असे नाव देण्यात आले.
एका हातात धरून हे दोन चमचे एकमेकांवर मारत त्यातून ठेका धरणे त्यामुळे सोपे झाले आहे. या पारंपरिक वाद्यामध्ये हवे ते बदल करण्यासाठी रशियन सरकारने नुग्मानोव्ह यांच्या टीमला आर्थिक मदतही केली.
Move over vuvuzelas, the 2018 #WorldCup is all about the ‘Spoons of Victory’.
🔊 Sound on! pic.twitter.com/w0EVMk73ZH
— BBC Radio 5 Live (@bbc5live) June 15, 2018
Miss Vuvuzelas? Russia's World Cup "Spoons Of Victory" will Never Measure Up https://t.co/02STcFSJZ9 pic.twitter.com/ZeNuSlk05u
— Betty Joe (@betty20202) June 15, 2018
Forget vuvuzelas – 'Spoons of Victory' are the new World Cup instrument https://t.co/5SqjpBEuDy pic.twitter.com/YZ74Id5Ay3
— Siglov Freudivan (@DerangedRadio) June 14, 2018
Move over Vuvuzela.
Meet the "Lozhkas", the spoon of victory that has been recognised as the tournament's official instrument.#WorldCup #SuperEagles pic.twitter.com/rQuWHPRVJj
— Tee (@lutosinGBELA) June 13, 2018
दक्षिण आफ्रिकेत २०१० साली झालेल्या विश्वकरंडकात वुवूझेला हे वाद्य प्रचंड लोकप्रिय झाले होते. एकाचवेळी हजारो लोक हे वाद्य वाजवून स्टेडियम दणाणून सोडत.
वुवूझेलाच्या या कर्णकर्कश्श आवाजाने हे वाद्य वादाच्या भोवऱ्यात सापडले. अनेक देशांतील स्टेडियमध्ये हे वाद्य वाजवण्यावर आता बंदी घालण्यात आली आहे. या बंदीतून बोध घेत रशियाने आपल्या देशात होणाऱ्या विश्वकरंडकासाठी तुलनेने कमी आवाज करणाऱ्या आणि ठेका धरता येणाऱ्या चमच्यांची निवड केली.
महत्वाच्या बातम्या-
–कर्णधार विराट कोहलीशी तुलना होणारा तो फलंदाज डोप टेस्टमध्ये दोषी
–जेव्हा भारतातील सर्वात प्रतिभावान यष्टीरक्षक घेतो जगातील महान यष्टीरक्षकाची भेट!