भारतीय संघाचे माजी सलामीवीर फलंदाज अरुण लाल सध्या ६६ वर्षांचे आहेत. आता या वयात हे माजी दिग्गज खेळाडू दुसरे लग्न करणार आहेत. त्यांच्या होणाऱ्या पत्नीचे नाव बुलबुल साहा आहे आणि त्यांचे वय ३८ वर्ष आहे. म्हणजेच अरुण यांची होणारी दुसरी पत्नी त्यांच्यापेक्षा तब्बल २८ वर्षांनी लहान आहे.
अरुण लाल (Arun Lal) आणि बुलबुल साहा (Bulbul Saha) यांचा विवाह २ मे रोजी कोलकातामधील पीयरलेस इन हॉटेलमध्ये होणार आहे. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाच्या पत्रिकेचा फोटोही व्हायरल होत आहे. व्हायरल फोटोत पाहिले जाऊ शकते की लग्नाची जवळपास सर्व तयारी पूर्ण झाली आहे. असे मानले जात आहे की, अरुण आणि बुलबुल यांच्या लग्नाला बंगाल क्रिकेट संघ, काही निवडक कुटुंबातील सदस्य आणि मित्र उपस्थित असतील. लग्नानंतर या दोघांचे रिसेप्शन देखील पीयरलेस इन हॉटेलमध्ये आयोजित केले आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अशीही माहिती आहे की, अरुण आणि बुलबुल मागच्या मोठ्या काळापासून एकमेकांना ओळखतात. त्यांचे हेच संबंध आता पती-पत्नीच्या नात्यात बदलणार आहेत. अरुण हे दुसरे लग्न त्यांची पहिली पत्नी रिवाच्या परवानगीने करत आहेत. माध्यमांतील वृत्तानुसार लग्नाच्या एक ते दीड महिना आधी अरुण आणि बुलबुल यांचा साखरपुडा पार पडला होता. त्याआधी अरुणने त्यांची पहिली पत्नी रिवाला त्यांच्या सहमतीने सोडचिठ्ठी दिली होती. अशीही माहिती आहे की, रिना मागच्या बऱ्याच दिवसांपासून आजारी आहे.
Congratulations Arun Lal Sir on his new wedding. 🙏💐 pic.twitter.com/2tToAmSXGW
— Gautam Trivedi (@KaptanHindostan) April 25, 2022
Arun Lal shared the invitation for his second marriage with his long-time friend Bul Bul Saha on May 2nd, 2022
Congratulations Arun Lal #Cricket pic.twitter.com/CEybHsJDN1— All About Cricket (@AllAboutCricke8) April 24, 2022
अरुण लाल सध्या बंगाल रणजी संघाचे प्रशिक्षक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात बंगाल क्रिकेट संघाने १३ वर्षांच्या दुष्काळानंतर २०२० साली पहिल्यांना रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात स्थान बनवले होते. चालू हंगामात देखील संघ त्यांच्या मार्गदर्शनात खेळत आहे आणि संघाचे प्रदर्शन अप्रतिम राहिले आहे. चालू हंगामातील पहिले सलग तीन सामने बंगालने जिंकले आहेत. बंगाल संघ १८ गुणांसह त्याच्या ग्रुपमध्ये अव्वल स्थानी आहे आणि उपांत्यपूर्वी फेरीत संघाने स्थान पक्के केले आहे.
त्याच्या क्रिकेट कारकिर्दीवर एक नजर टाकली, तर त्यांनी खेळलेल्या १६ कसोटी सामन्यांमध्ये ६ अर्धशतकांच्या मदतीने ७२९ धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांनी १३ सामने खेळले आणि एका अर्धशतकाच्या मदतीने १२२ धावा केल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर १५६ सामन्यांमध्ये १०४२१ धावांची नोंद आहे. यादरम्यान त्यांनी ३० शतके आणि ४३ अर्धशतके केली.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
अनुभवी असूनही ब्रावोने २ वेळा क्रिज बाहेर फेकला चेंडू, मग अंपायरनेही दिला जशास तसा निर्णय
नया है यह! लाईव्ह सामन्यात फेस प्रोटेक्शन घालून रिशी धवनने केली गोलंदाजी, पण का? जाणून घ्या कारण
सलग ८ पराभवांनंतर रोहित शर्माचे तुटले हृदय, केले भावूक ट्वीट; चाहत्यांचेही मानले आभार