भारतीय हौशी कबड्डी महासंघ व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने ६६ वी वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा दि. २८ जानेवारी ते ३१ जानेवारी २०१९ या कालावधीत रोहा, रायगड येथे आयोजित करण्यात आली आहे.
राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र पुरुष गट प्रतिनिधीक संघाच्या निवडी करता ३० खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. २० खेळाडू हे राज्य अजिंक्यपद स्पर्धेत खेळले असून १० खेळाडूची प्रो कबड्डीतील कामगिरी नुसार निवड करण्यात आली आहे. या शिबिरातून राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र प्रतिनिधीक संघाच्या अंतिम १२ खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे.
रायगड जिल्ह्या कबड्डी असोसिएशनच्या सौजन्याने दि. १३ जानेवारी पासून अलिबाग रायगड याठिकाणी खेळाडूचे सराव शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
सराव शिबिरासाठी निवड झालेल्या ३० खेळाडूंची यादी.
मुंबई शहर– सुशांत साहिल, पंकज मोहिते, विशाल माने
मुंबई उपनगर– रिशांक देवडिगा, आशिष मोहिते
ठाणे– गिरीश इरणक, निलेश साळुंखे
रायगड– अमीर धुमाळ, संकेत बनकर
रत्नागिरी– अभिषेक भोजने, अजिंक्य पवार, प्रदीप शिंदे,
सांगली– नितीन मदने, राहुल वडार, सचिन शिंगाडे
कोल्हापूर– अक्षय निकम, ऋतुराज कोरवी, तुषार पाटील
पुणे- विकास काळे, सिद्धार्थ देसाई, सुनील दुबळे
नाशिक– प्रणव अहिरे
जळगाव– विजेंद्र सपकाळे
जालना– कृष्णा गायके
परभणी– संदीप राठोड
अहमदनगर– धनंजय आसने
नंदुरबार-सूरज देसाई
बीड- मार्तंड फुंडे
धुळे– दिवाकर पाटील
पालघर– अरविंद देशमुख
महत्त्वाच्या बातम्या –
–“चिंतामणी चषक” राज्यस्तरीय कुमार गट कबड्डी स्पर्धेचे असे होणार बादफेरीचे सामने
–भारताचा अमिराती विरुद्ध पराभव, बाद फेरीत जाण्याच्या अडचणी वाढल्या