महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने नाशिक जिल्हा परिषद व सह्याद्री युवा मंच, सिन्नर संस्था सौजन्याने ६६ वी वरिष्ठ गट पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा दि. ३१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०१८ या कालावधी मध्ये आडवा फाटा मैदान सिन्नर, नाशिक येथे आयोजन करण्यात आली आहे.
नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने नाशिक जिल्हा परिषदच्या अध्यक्षा शितलताई सांगळे व सह्याद्री युवा मंच, सिन्नर या संस्थाने ६६ व्या वरिष्ठ गट पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेचं आयोजन केलं आहे.
यास्पर्धेत राज्यातून पुरुषाचे २५ संघ तर महिलांचे २० संघ सहभागी होणार आहेत. जवळपास ५४० पुरुष व महिला खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार आहेत. तसेच राज्यभरातून ७० पंच स्पर्धेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत.
स्पर्धेसाठी मातीची सहा मैदाने असणार आहेत. राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेतून निवडला जाणारा पुरुष व महिला संघ ६६ व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
प्रो कबड्डीमूळे या खेळाला गतवैभव प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रात वर्षभरात अनेक राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धाच आयोजन करण्यात येत. पण मानाची व महत्वाची स्पर्धा समजली जाणारी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा. या स्पर्धेतील कबड्डीचा थरार कबड्डीप्रेमींना पाहायला मिळावा म्हणून सुसज्ज अशी १०००० प्रेक्षक क्षमतेची गॅलरी बनवण्यात येणार आहे. तसेच स्क्रीनवर थेट प्रेक्षपन करण्यात येणार आहे. खेळाडू, पंच व कबड्डी संघटक केंद्रस्थानी मानुन निवास, भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे.
राज्य अजिंक्यपद स्पर्धेचं कोण आहे आयोजक ?,
नाशिक जिल्ह्या कबड्डी असोसिएशनच्या वतीने नाशिक जिल्हा परिषद व सह्याद्री युवा मंच, सिन्नर संस्था सौजन्याने ६६ व्या वरिष्ठ गट पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धाच आयोजन करण्यात येणार आहे.
राज्य अजिंक्यपद स्पर्धा कुठे व कधी होणार ही स्पर्धा ?
६६ वी वरिष्ठ गट पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा दि. ३१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०१८ या कालावधी मध्ये आडवा फाटा मैदान सिन्नर, नाशिक येथे पार पडणार आहे.
राज्य अजिंक्यपद स्पर्धेत किती संघ होणार सहभागी ?
राज्यभरातून पुरुषाचे २५ संघ तर महिलांचे यंदा २० संघ सहभागी होण्याची शक्यता आहे. जवळपास ५४० पुरुष व महिला खेळाडू सहभागी होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–विराट की धोनी? कोण करणार वन-डेत १० हजार धावा आधी
–रोहित हिटमॅन शर्माने केला क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम; गांगुली, सचिनलाही टाकले मागे
–सायना नेहवालला डेन्मार्क ओपनचे उपविजेतेपद