fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

विराट की धोनी? कोण करणार वन-डेत १० हजार धावा आधी

गुवाहाटी | भारत विरुद्ध विंडीज मालिकेतील पहिल्या वन-डेत भारताकडून विराट कोहली आणि रोहित शर्माने शतकी कामगिरी केली. भारताने हा सामना तब्बल ८ विकेट्सने जिंकला.

या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या विराटला भारताकडून वन-डेत आता १० हजार धावा करण्यासाठी केवळ ८१ धावांची गरज आहे. याचबरोबर भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला वन-डेत भारताकडून १० हजार धावा करण्यासाठी ५१ धावांची गरज आहे.

विराटने २१२ सामन्यात ५८.६९च्या सरासरीने ९९१९ धावा केल्या आहेत. तर काल फलंदाजीची संधी न मिळालेल्या धोनीने कारकिर्दीत ३२५ वन-डेत ५०.२४च्या सरासरीने ९९४९ धावा केल्या आहे.

भारताकडून आजपर्यंत सचिन तेंडूलकर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुलीने १० हजार धावा केल्या आहेत. यामुळे धोनी आणि विराटमध्ये जो पहिल्यांदा हा १० हजार धावा करणार तो चौथा भारतीय खेळाडू बनेल.

महत्त्वाच्या बातम्या:

रोहित हिटमॅन शर्माने केला क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम; गांगुली, सचिनलाही टाकले मागे

सायना नेहवालला डेन्मार्क ओपनचे उपविजेतेपद

हेटमेयरच्या शतकाच्या जोरावर विंडीजचे टीम इंडियासमोर विजयासाठी ३२३ धावांचे आव्हान

२००वा वनडे सामना खेळणाऱ्या या दिग्गज फलंदाजाच्या नावावर झाला नकोसा विक्रम

२०१९ च्या आयपीएलमध्ये बेंगलोरचा विकेटकिपर खेळणार मुंबईकडून

 

 

You might also like