भारतीय हौशी कबड्डी महासंघ व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने 66 व्या वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन 28 जानेवारी ते 31 जानेवारी 2019 दरम्यान केले आहे.
या स्पर्धेचे आयोजन डी. जी. तटकरे क्रीड़ा नगरी, म्हाडा सोसाइटी ग्राउंड, रोहा, जिल्हा रायगड, महाराष्ट्र येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत 31 संघाचे 434 खेळाडू सहभागी होणार आहेत.
ही स्पर्धा रोहा येथे अयोजित करण्याबद्दल सुनील तटकरे यांनी महाराष्ट्र राज्य कबड्डी एसोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांना विनंती केली होती, या विनंतीचा त्वरित स्विकार करण्यात आला आणि रोहा येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेची सध्या तयारी सुरु असून 20 हजारपेक्षाही अधिक प्रेक्षक बसू शकतील अशी बैठकव्यवस्था करण्यात आली आहे. तसेच लाईट सेटअपही चांगला करण्यात आला असून वर छतही टाकण्यात आले आहे. या स्पर्धेला यशस्वी बनविण्यासाठी सर्व अधिकारी, सहकारी आणि स्वयंसेवक मेहनत घेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
–नोव्हाक जोकोविचने सातव्यांदा जिंकले ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद
–सायना नेहवालला इंडोनेशिया मास्टर्सचे विजेतेपद
–संपूर्ण यादी: गौतम गंभीर, सुनील छेत्रीसह या भारतीय खेळाडूंची २०१९ पद्म पुरस्कारांसाठी झाली निवड