मुंबई: महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने घेतलेल्या जाणाऱ्या वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धांचा यंदाचा मान चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशनच्या सौजन्याने रत्नागिरी कबड्डी असोसिएशनला मिळाला आहे.
मागील वर्षी ६६ व्या वरीष्ठ गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा घेण्याचा मान नाशिक जिल्ह्या कबड्डी असोसिएशन (सिन्नर) ला मिळाला होता. यास्पर्धेत पुरुष गटात रायगड तर महिला गटात पुणे संघाने विजेतेपद पटाकवले होते.
यंदा ६७ वी वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा डिसेंबर २०१९ ला चिपळूण येथे होणार आहे. १३ वर्षापूर्वी ५४ वी वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा २००६ साली चिपळूण-रत्नागिरी येथे झाली होती. त्यावेळी पुरुष व महिला दोन्ही गटात पुणे जिल्हाने विजेतेपद पटकावले होते.