---Advertisement---

६७व्या महाराष्ट्र राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेची गटवारी जाहीर

On: सोमवार, डिसेंबर 16, 2019 6:25 PM
---Advertisement---

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन व चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या सौजन्याने ६७ वी वरिष्ठ गट पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद स्पर्धा चिपळूण येथे होत आहे. या निवड चाचणी कबड्डी स्पर्धेची गटवारी आज जाहीर करण्यात आली आहे.

स्पर्धेत पुरुषाचे २५ तर महिलांचे २० संघ सहभागी होणार आहेत. मागील राज्य अजिंक्यपद स्पर्धेच्या क्रमवारीनुसार गटवारी तयार करण्यात येत. पुरुष व महिला विभागाच्या संघाचे ६-६ गटात विभागणी करण्यात आली आहे. पुरुषांच्या ‘अ’ गटात गतविजेत्या रायगड जिल्हासह, ठाणे, नाशिक व हिंगोली हे संघ आहेत. तर ‘ब’ गटात उपविजेते सांगली, धुळे, सोलापूर व लातूर हे संघ आहेत. यजमान रत्नागिरी ‘क’ गटात आहे.

महिला विभागात गतविजेता पुणे संघ ‘अ’ गटात आहे. तसेच उपविजेते मुंबई उपनगर ‘ब’ तर यजमान रत्नागिरी ‘क’ गटात आहेत. प्रत्येक गटातील विजयी व उपविजयी संघ बादफेरीत प्रवेश करतील.

ही स्पर्धा दि. १९ डिसेंबर २०१९ ते २२ डिसेंबर २०१९ या कालावधीमध्ये पवन तलाव मैदान, इंदिरा गांधी स्टेडियम शेजारी, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली आहे.

पुरुष विभाग गटवारी:
‘अ’ गट:- रायगड, ठाणे, नाशिक, हिंगोली
‘ब’ गट:- सांगली, धुळे, सोलापूर, लातूर
‘क’ गट:- रत्नागिरी, अहमदनगर, पालघर, नांदेड
‘ड’ गट:- मुंबई शहर, बीड, जालना, सिंधुदुर्ग
‘इ’ गट:- मुंबई उपनगर, नंदुरबार, जळगांव, सातारा
‘फ’ गट:- पुणे, कोल्हापूर, उस्मानाबाद, परभणी, औरंगाबाद

महिला विभाग गटवारी
‘अ’ गट:- पुणे, सिंधुदुर्ग, सांगली
‘ब’ गट:- मुंबई उपनगर, अहमदनगर, औरंगाबाद
‘क’ गट:- रत्नागिरी, रायगड, परभणी
‘ड’ गट:- पालघर, सातारा, जालना
‘इ’ गट:- कोल्हापूर, ठाणे, धुळे, सोलापूर
‘फ’ गट:- मुंबई शहर, नाशिक, बीड, जळगाव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---