---Advertisement---

धोनीच्या वाढदिवसाची ठिकठिकाणी जोरदार तयारी! या शहरांमध्ये होणार बायोपिकचं स्पेशल स्क्रिनिंग

On: बुधवार, जुलै 3, 2024 7:40 PM
CSK MS Dhoni
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा वाढदिवस जवळ येत आहे. धोनीचा वाढदिवस 7 जुलैला आहे. त्याआधी धोनीचा वाढदिवस खास बनवण्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. त्यापैकीच एक म्हणजे धोनीच्या बायोपिकचं स्पेशल स्क्रिनिंग, ज्याचं बुकिंग सुरू झालं आहे.

महेंद्रसिंह धोनीच्या बायोपिकचं नाव ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ आहे, जी 30 सप्टेंबर 2016 रोजी जगभरातील थिएटरमध्ये पहिल्यांदा प्रदर्शित झाली होती. परंतु आता धोनीच्या वाढदिवशी ती पुन्हा एकदा प्रदर्शित होणार आहे. हैदराबाद, चेन्नई, विजयवाडा आणि विशाखापट्टणम या शहरांमध्ये या स्पेशल स्क्रीनिंगसाठी बुकिंग सुरू झालं आहे.

‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात सुशांत सिंग राजपूतनं एमएस धोनीची भूमिका साकारली होती. याशिवाय कियारा अडवाणी, दिशा पटानी आणि अनुपम खेर देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाचं बजेट 104 कोटी रुपये होतं. ‘एमएस धोनी – द अनटोल्ड स्टोरी’नं जगभरातील बॉक्स ऑफिसवर 215.4 कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटानं भारतात 184.78 कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपटाचं पहिल्या दिवसाचं कलेक्शन 21.4 कोटी रुपये होतं.

एमएस धोनीनं 2004 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानं 2019 मध्ये शेवटचा सामना खेळला आणि 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. मात्र धोनी अजूनही आयपीएलमध्ये खेळतो आहे.

कसोटी कारकीर्द – एमएस धोनीनं त्याच्या कारकिर्दीत 90 कसोटी सामने खेळले. या 90 कसोटी सामन्यांमध्ये त्यानं 59.1 च्या स्ट्राइक रेटनं 4876 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 33 अर्धशतकं आणि 6 शतकांचा समावेश आहे.

एकदिवसीय कारकीर्द – एमएस धोनीनं त्याच्या कारकिर्दीत 350 एकदिवसीय सामने खेळले. या 350 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यानं 87.6 च्या स्ट्राइक रेटनं 10773 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 73 अर्धशतकं आणि 10 शतकांचा समावेश आहे. एमएस धोनीची वनडेतील सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 183 धावा आहे.

टी20 आंतरराष्ट्रीय कारकीर्द – एमएस धोनीनं 98 टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले, ज्यामध्ये त्यानं 126.1 च्या स्ट्राइक रेटनं 1617 धावा केल्या आहेत. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे.

आयपीएल कारकीर्द – एमएस धोनीनं आतापर्यंत 264 आयपीएल सामने खेळले, ज्यामध्ये त्यानं 137.5 च्या स्ट्राइक रेटनं 5243 धावा केल्या आहेत. यात 24 अर्धशतकांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

भारत-पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्याची तारीख ठरली, या दिवशी येणार कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने
झिम्बाब्वेविरुद्ध 8 वर्षांपासून हरलेला नाही भारत, टी20 मध्ये आहे जबरदस्त रेकॉर्ड!
हा ‘कुंभकर्ण’ खेळाडू कोण? ज्याची झोपेमुळे चुकली टीम बस! भारताविरुद्धच्या सामन्यात बसावं लागलं बाहेर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---