---Advertisement---

IND Vs ENG : दुसऱ्या कसोटीत वॉशिंग्टन सुंदरसह टीम इंडियाचे ‘हे’ ७ खेळाडू बसणार बाकावर?

On: शुक्रवार, फेब्रुवारी 12, 2021 11:25 AM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड संघादम्यान झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. इंग्लंडने या सामन्यात भारताचा 227 धावांनी मोठा पराभव केला. या पराभवानंतर भारतीय संघावर सर्व बाजूने टीका होत आहे. भारतीय संघात काही बदल करण्यात यावे, अशी मागणी देखील केली जात आहे. अशा परिस्थितीत संघातील 7 खेळाडूंची दुसऱ्या सामन्यात खेळण्याची शक्यता फार कमी आहे.

गोलांदाजी विभागाचा विचार केला असता इशांत शर्मा, शाहबाज नदीम, वॉशिंग्टन सुंदर व शार्दुल ठाकूर यांना दुसऱ्या कसोटीत संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे. इशांत, नदीम व सुंदरने पहिला कसोटी सामना खेळला होता. मात्र तिघांनाही गोलंदाजीत काही विशेष कामगिरी करता आली नाही. इशांतने पहिल्या सामन्यात 3 तर नदिमने 4 बळी मिळवले होते. दुर्दैवाची बाब म्हणजे, सुंदरला संपूर्ण सामन्यात एकाही फलंदाजाला बाद करता आले नाही. त्यामुळे या तिघांच्या जागी संघातील इतर गोलंदाजांना संधी मिळू शकते. दुसऱ्या कसोटी सामन्यातील खेळपट्टी फिरकीपटूंसाठी अनुकूल असेल. अशा परिस्थितीत शार्दुलची देखील दुसऱ्या कसोटीत खेळण्याची शक्यता फार कमी आहे.

भारतीय फलंदाजी फळी पहिल्या कसोटी सामन्यात सपशेल फ्लॉप ठरली होती. पहिल्या 5 मधील कोणत्याच फलंदाजाला पहिल्या डावात अर्धशतक झळकावता आले नाही. मात्र कर्णधार विराट कोहलीने दिलेल्या संकेतानुसार फलंदाजी विभागात बदल केले जाण्याची शक्यता अत्यंत नगण्य आहे. विराटने स्पष्ट केले होते की, संघ व्यवस्थापनाला आपल्या फलंदाजांवर पूर्ण विश्वास आहे. अशा परिस्थितीत मयंक अगरवाल व केएल राहुल यांना पुन्हा एकदा संघाबाहेर बसावे लागेल.

यष्टिरक्षक रिषभ पंत ने पहिल्या सामन्यात शानदार कामगिरी केली होती. रिषभने भारताच्या पहिल्या डावात 88 चेंडूत 9 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने 91 धावा केल्या होत्या. त्यामुळे वृद्धिमान साहाला दुसऱ्या कसोटीत संधी मिळणार नसल्याचे जवळजवळ स्पष्टच आहे. अशाप्रकारे वरील 7 खेळाडूंना दुसऱ्या कसोटीत संधी मिळण्याची शक्यता अतिशय नगण्य आहे.

दरम्यान या मालिकेतील दुसरा कसोटी सामना 13 फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहे. भारतीय क्रिकेट प्रेमींना आशा असेल की, दुसऱ्या सामन्यात कोणत्याही खेळाडूला संधी मिळाली तरी त्याने उत्तम कामगिरी करावी. भारतीय संघ 4 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने पिछाडीवर असून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात स्थान निश्चित करण्यासाठी संघाला विजय आवश्यक आहेत. अशात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल की, पहिल्या सामन्यात मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघ कशाप्रकारे मैदानात पुनरागमन करतो?

महत्त्वाच्या बातम्या-

अक्रमसारखा वेगवान गोलंदाज बनण्याची स्वप्ने पाहणारा नदीम ‘असा’ बनला फिरकीपटू

IPL 2021: श्रीसंतच्या पदरी निराशा, लिलावासाठी शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये नाही मिळालं स्थान

बीसीसीआयचं मोठं पाऊल! चेन्नई कसोटीतील टीम इंडियाच्या दारुण पराभवानंतर पिच क्यूरेटरची सुट्टी 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---